MEC Welfare Foundation: मोहरम निमित्त 'MEC वेलफेअर फाउंडेशन' आणि 'व्यंकटेश नेत्रालय' हिंगोलीत मुक्त चश्मा वाटप, नेत्र तपासणी, रेटिना शल्यक्रिया..
हिंगोली (नेत्र) : मोहरम निमित्त MEC वेलफेअर फाउंडेशन आणि व्यंकटेश नेत्रालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २४ जून २०२६ रोजी शहरातील मेराज चौक येथील आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे.
शिबिरात गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यासोबतच मोतिबिंदूवरील शस्त्रक्रियाही मोफत केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर रेटिना शस्त्रक्रिया देखील निःशुल्क केली जाणार आहे. फेको तज्ज्ञ डॉ. किशन दत्तराम लखमावार आणि रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रतिक किशन लखमावार हे या शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन व उपचार करणार आहेत.
या (MEC Welfare Foundation) सेवाभावी उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेख निहाल भैय्या यांच्यावतीने करण्यात आले आहे. शिबिरासाठी नोंदणी निहाल भैय्या संपर्क कार्यालय, हिंगोली येथे सुरू असून ९२८४२४७०३७ किंवा ८०८०२२२४७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.