विद्यार्थ्यांना तापाचा प्रादुर्भाव

Fever Outbreak : मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण

महाराष्ट्रातील मुरखळा माल शाळेत विद्यार्थ्यांना तापाचा प्रादुर्भाव झाला. फायलेरियाच्या गोळ्यांचा वापर केला गेला, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी आजारी पडले.

By : देशोन्नति
Fever Outbreak : मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण

८ फेब्रुवारी रोजी दिल्या होत्या फायलेरियाच्या गोळ्या

कुनघाडा रै (Fever Outbreak) : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथे  तापाच्या संसर्गाची लागण झाली असल्याने  अनेक विद्यार्थ्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

मुरखळा माल आरोग्य उपकेंद्र अंतर्गत परिचारिका बोगावार , आशा वर्कर यांच्या माध्यमातून शालेय शिबीर राबवित विद्यार्थ्यांना फायलेरियाच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या होत्या.

४  दिवसा अगोदर लोकमान्य विद्यालय मुरखळा माल १ येथील कुंजन सुकदेव टिकले (१३) वर्ग ८वा, मुरखळा माल जि.प. शाळेतील तुषार मारोती गाडेमोडे (१४), प्रगती गणेश मंडरे (१२) वर्ग ६ वा, वंश राजेंद्र चुदरी (८)वर्ग २ रा, भूषण दिलीप तुंबडे(१२), प्रदेस रुमाजी सातपुते(१२),मानस रुमाजी सातपुते (१०) या विद्यार्थ्यांना व काही नागरीकांना फायलेरीयाच्या गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर जवळपास गावातील बहुतांश नागरीक व विद्यार्थ्यांना  उलट्या, चक्कर येणे, डोके दुखणे व ताप येत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी दवाखान्यात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले.

विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परत गावातील रुग्ण ग्रामीण रुग्णालय येथे भरती होण्यासाठी येत असल्याचे दिसुन येत आहे. तात्काळ चामोर्शी येथील शल्य चिकीत्सक डॉ. प्रवीण किलनाके  यांच्याशी संपर्क करून सदर घटनेसंदर्भात विचारणा केली असता , फायलेरियाच्या गोळ्या खाल्ल्यामुळे ताप वगैरे येत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

गावातील प्रतिष्ठित नागरिक  काँग्रेसचे मीडिया प्रमुख विजय लाड रुग्णांना भेट देत पालकांना धिर  दिला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विषबाधा गोळ्यांमुळे झाली की आणखी काही कारण आहे यांचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी  केली आहे.

फायलेरियाच्या गोळ्यांचा परिणाम नाही : डीएचओ शिंदे

विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संदर्भात जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी मूरखळा माल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी व उरलेल्या इयत्ता पाचवीच्या  विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी रोजी फायलेरियाच्या गोळ्यांचे वाटप केल्याचे सांगितले. सोबतच लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना २० तारखेला  गोळ्या दिल्या आहेत. फायलेरियाच्या गोळ्याचा काही साईड इफेक्ट असता तर तो एक तास,दोन तास किंवा फारही फार एक दिवसांमध्ये दिसला असता. त्यामुळे   गोळ्यांचा कोणताही दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर झाला नसल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.विद्यार्थ्यांना तापाच्या संसर्गाची लागण झाली असण्याची शक्यता त्यांनी वर्ताविली. विद्यार्थ्यांना नेमका संसर्ग कशामुळे झाला याची चौकशी सुरू असल्याचेही डॉ.शिंदे यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! दहावी-बारावीच्या परीक्षा कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! दहावी-बारावीच्या परीक्षा कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी २०२७ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! लेखी, प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

Nov 07, 2026
झारखंडचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी महाराष्ट्रात सापडला; ठाकुर्लीतून ATS ने केली अटक

झारखंडचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी महाराष्ट्रात सापडला; ठाकुर्लीतून ATS ने केली अटक

ठाणे ATS ची मोठी कारवाई! झारखंडचा १० लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी संजय सरोज यादव ठाकुर्लीतून अटकेत.

Nov 07, 2026
महाराष्ट्रात PG मेडिकलच्या १,०६६ जागा वाढल्या; देशात दुसरा क्रमांक!

महाराष्ट्रात PG मेडिकलच्या १,०६६ जागा वाढल्या; देशात दुसरा क्रमांक!

महाराष्ट्रात PG मेडिकलच्या १,०६६ जागांची वाढ! सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७२० जागांची भर पडली असून, ७,६१५ जागांसह राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर.

Nov 07, 2026
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ९ नोव्हेंबरला सरकारी कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर.

Nov 06, 2026
महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरू होणार? कंपनीचा मुंबई हायकोर्टातील अर्ज मागे; नव्या लेबलसह FSSAI कडे धाव

महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरू होणार? कंपनीचा मुंबई हायकोर्टातील अर्ज मागे; नव्या लेबलसह FSSAI कडे धाव

महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरू होणार? कंपनीने मुंबई हायकोर्टातील याचिका मागे घेत नव्या लेबलसह FSSAI कडे जाण्याचा निर्णय घेतला.

Nov 06, 2026