हिंगोली (Dr. Srinivas Kandi) : दांडिया महोत्सवाचा आनंद लुटत असतानाही माणुसकीला प्राधान्य देत एका अपघातग्रस्त रुग्णाचा जीव वाचवल्याबद्दल चिरायू हॉस्पिटलचे डॉ. श्रीनिवास कंदी (Dr. Srinivas Kandi) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिंगोली शहरातील मंगळवारा भा गातील बागवानपुरा येथील रहिवासी मोहम्मद यासीन मोहम्मद आजम हे १८ ऑक्टोबर रोजी औंढा नागनाथ ते हिंगोली दुचाकीवर येत असताना अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी चिरायू हॉस्पिटलचे डॉ. श्रीनिवास कंदी (Dr. Srinivas Kandi) यांना फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी डॉ. कंदी (Dr. Srinivas Kandi) हे शहरात सुरू असलेल्या दांडिया महोत्सवात कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते. मात्र, रुग्णाची गंभीर स्थिती समजताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता दांडिया खेळणे थांबवले आणि रुग्णाला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन या, मी आलोच असे सांगत थेट रुग्णालय गाठले.
हॉस्पिटल बंद झाल्यावरही आणि सणाच्या कार्यक्रमात असतानाही त्यांनी तातडीने रुग्णाची तपासणी केली. प्रथम सीटी स्कॅन करून डोक्यातील रक्तस्त्राव निदर्शनास आल्यावर तातडीने उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे रुग्णाची प्रकृती आता ठणठणीत असून ते पूर्णपणे शुद्धीवर आले आहेत.
"डॉक्टर साहेबांनी माणुसकी जपत कार्यक्रम सोडून वेळेवर उपचार केले, त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. ते रुग्णांसाठी देवदूतच आहेत. ते आधी उपचार करतात, बाकी प्रक्रिया नंतर,अशी भावुक प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. डॉ. कंदी (Dr. Srinivas Kandi) हे नेहमीच रुग्णाची आर्थिक परिस्थिती न पाहता आधी उपचाराला प्राधान्य देत असल्याने रुग्णांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे.