Somthana Sub Center: प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत उपकेंद्र सोमठाणा या आरोग्य संस्थेने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय आरोग्य संस्था 'राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था..
हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार
हिंगोली (Somthana Sub Center) : हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत उपकेंद्र सोमठाणा या आरोग्य संस्थेने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय आरोग्य संस्था 'राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्र दिल्ली'ने निर्धारित केलेल्या निर्देशांकांची पूर्तता करून, विशेष परीक्षण केंद्रीय गठीत समितीमार्फत करण्यात आले. सदरील केंद्रीय परीक्षण 21 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले. सदरील परीक्षणमध्ये केंद्रीय परीक्षक डॉ. जेम्स टी. डी. पोडिचेरी , डॉ. मोहम्मद इरफान अहमद राजस्थान यांनी मुद्देनिहाय परीक्षण करून अहवाल केंद्रीय समितीस सादर केला.

या अहवालानुसार उपकेंद्र सोमठाणा आरोग्य संस्थेने (Somthana Sub Center) ९३ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन केंद्रीय महत्त्वाकांक्षी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या उपकेंद्राला आरोग्य संस्थेचा बहुमान मिळाला. त्याबद्दल राज्यस्तरीय अधिका-यांनी भरभरून कौतुक केले व स्थानिक नागरिकांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. याचे खरे श्रेय सोमठाणा उपकेंद्राची टीम समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रवी कुमार करवंदे, आरोग्य सेविका रुपाली झाड आरोग्य कर्मचारी कैलास लेकुळे, राहुल दरगु व वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ सूर्यवंशी व डॉ. दिव्या भारती यांच्यासह संपूर्ण कर्मचारी स्टाफ यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन तयारी केली. त्यातच जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार यांनी सुद्धा अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले. या सर्वांमुळे हे यश संपादन करता आले.
हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सपोर्ट मिळाल्यामुळे हे यश संपादन करता आले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे व एमकॉस असेसमेंट वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रुवार डॉ. विनोद आतुरकर, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. ताटेवाड, डॉ. जाधव, डॉ. खैरे यांची सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.