वाशिम कोरडा दुष्काळ

वाशिम जिल्ह्यात ४५ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड, संपूर्ण जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा

Washim Dry Drought: वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये चालू खरीप हंगामात तब्बल ४५ दिवसांचा मोठा पावसाचा खंड (Dry Spell) पडला आहे. या दीर्घकालीन कोरड्या वातावरणामुळे आणि तीव्र टंचाईमुळे

वाशिम जिल्ह्यात ४५ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड, संपूर्ण जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा

Washim Dry Drought

 

आ. धर्मगुरु बाबुसिंग महाराजांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मानोरा (Washim Dry Drought) : वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये चालू खरीप हंगामात तब्बल ४५ दिवसांचा मोठा पावसाचा खंड (Dry Spell) पडला आहे. या दीर्घकालीन कोरड्या वातावरणामुळे आणि तीव्र टंचाईमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर व इतर सर्व खरीप पिके पूर्णपणे जळून नष्ट झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वाशिम जिल्हा तात्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य आ. धर्मगुरु बाबुसिंग महाराज (राठोड) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सततच्या या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत हताश, खचलेला आणि आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे, खते आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आगामी जीवनाचा व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आधीच आर्थिक विवंचनेत असणारा बळीराजा या अस्मानी संकटात पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आकांक्षित वाशिम जिल्ह्यात ओढवलेली ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता.

संपूर्ण जिल्ह्यात तातडीने 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा, नष्ट झालेल्या पिकांचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यासाठी संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्यात यावेत,  शेतकरी कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी भरीव आर्थिक मदत व हेक्टरी नुकसानभरपाई तात्काळ जाहीर करावी. या अत्यंत संवेदनशील व आपत्कालीन परिस्थितीची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

टैग्स: Washim Dry Drought