वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित

वर्धा जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना मिळणार विविध सवलती

Wardha district declared drought-hit: वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी आणि कारंजा या आठही तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जारी..

वर्धा जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना मिळणार विविध सवलती

Wardha district declared drought-hit

 

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय;
जमीन महसुलात सूट, पीककर्ज पुनर्गठनासह विविध उपाययोजनांचा समावेश

वर्धा (Wardha district declared drought-hit.) : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ३०५ तालुक्यांमध्ये विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी आणि कारंजा या आठही तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

खरीप हंगामातील पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी कोणत्या सवलती?
शासन निर्णयानुसार, दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत आणि शैक्षणिक शुल्कात सवलत यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता आणणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पीक परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस निर्देशांक संकलित करून (Wardha district declared drought-hit) पीक परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा समावेश झाल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभासाठी संबंधित सवलतींच्या अटी आणि पात्रतेचे निकष लागू राहतील.