अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या

अल्पभूधारक शेतकर्‍याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Smallholder Farmer Suicide: तालुक्यातील वाळकी येथील अल्पभूधारक शेतकरी सखाराम परसराम गारोळे (४६) यांनी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाअभावी पिकांचे नुकसान

अल्पभूधारक शेतकर्‍याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Smallholder Farmer Suicide

औंढा नागनाथ (Smallholder Farmer Suicide) : तालुक्यातील वाळकी येथील अल्पभूधारक शेतकरी सखाराम परसराम गारोळे (४६) यांनी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाअभावी पिकांचे नुकसान, सततची नापिकी गावात रोजगाराचा अभाव आणि मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने ते चिंतेत होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. गारोळे यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता. यंदा पावसाअभावी पिके वाया गेल्याने उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला होता.

गावातही कामधंदा उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, दुसरी मुलगी विवाहयोग्य आहे. तिच्यासाठी स्थळे येत होती; मात्र लग्नाचा खर्च कसा भागवायचा, याची चिंता त्यांना सतावत होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात १९ ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वाळकी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी (Smallholder Farmer Suicide) औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत सखाराम गारोळे यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.