तरुण शेतकरी आत्महत्या

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! 

Young Farmer Suicide: दुष्काळ अन् खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या सततचा दुष्काळ, शेतातील पिके हातातोंडाशी आलेली असताना ती डोळ्यांसमोर जळून जाणे आणि कर्जाचा डोंगर

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या! 

Young Farmer Suicide

लातूर (Young Farmer Suicide) : जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे.  दुष्काळ अन् खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या सततचा दुष्काळ, शेतातील पिके हातातोंडाशी आलेली असताना ती डोळ्यांसमोर जळून जाणे आणि खाजगी सावकारासह बँकांच्या कर्जाचा वाढलेला डोंगर यामुळे हवालदिल झालेल्या लांबोटा (ता. निलंगा) येथील एका ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अमोल पंढरीनाथ मुगळे (वय ४१) असे दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे निलंगा तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे.

पिकं जळाल्याची चिंता अन् कर्जाचा बोजा
सध्या मराठवाड्यामध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Young Farmer Suicide) शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आणि कष्टाने खरीप हंगामात शेतात पिके घेतली होती; मात्र पावसाअभावी ही पिके पूर्णपणे सुकली व जळून खाक झाली. शेतात हजारो रुपयांची लागवड करून केलेली पेरणी डोळ्यांसमोर वाळत असल्याचे पाहून या शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट ओढवले. बँकांचे व खाजगी सावकारांचे कर्ज कसे फेडायचे आणि आपल्या तीन मुलींचे शिक्षण व संसार कसा चालवायचा, याच विवंचनेतून अमोल मुगळे यांनी रविवारी (दि. ११) सायंकाळी आठ वाजता निलंगा शहरातील शिवाजीनगर येथील राहत्या घरी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप
या (Young Farmer Suicide) घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले असले, तरी अनेक ठिकाणी महिना उलटून गेला तरी अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही. जर वेळेत मदत मिळाली असती, तर कदाचित या तरुण शेतकऱ्याचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. हाताजवळील सर्व पैसा शेतीत घातल्यामुळे शेतकरी आज अक्षरशः उघड्यावर पडला आहे आणि याच नैरासयातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे बोलले जात आहे.

हसत्याखेळत्या कुटुंबावर ओढावले दुःखाचे डोंगर
मृत अमोल मुगळे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. (Young Farmer Suicide) घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.