Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > शेती

शेतकरी युवक आत्महत्या

कुरुंद्यात नापिकीला कंटाळून शेतकरी युवकाची आत्महत्या

Young Farmer Suicide: कुरुंदा येथील शेतकरी गितेश सोमवारे वय ३५ वर्षं याने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.


कुरुंद्यात नापिकीला कंटाळून शेतकरी युवकाची आत्महत्या

Young Farmer Suicide |

कुरुंदा (Young Farmer Suicide) : येथील शेतकरी गितेश सोमवारे वय ३५ वर्षं याने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास  गितेश शेतात जातो असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडला होता. मात्र रात्रभर तो घरी परतला नाही. सकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीय व मित्रपरिवाराने शेतात शोध घेतला असता शेतातील आखाड्यावर त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

यावर्षी निसर्गाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूससह सर्वच पिके हातातून गेली होती. सततची नापिकी, वाढता खर्च आणि हातातोंडाशी आलेले पीक गेल्याच्या विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची दबक्या आवाजात चर्चा गावात सुरू आहे. गितेश हा हसतमुख, मनमिळावू व सर्वांच्या मदतीला धावून जाणारा युवक म्हणून परिचित होता. कुटुंबातील एकुलता एक आधार हरपल्याने सोमवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे भगवान वडकीले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. (Young Farmer Suicide) शवविच्छेदना नंतर कुरुंदा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे  यावेळी मोठ्या संख्येने मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.