आखाडा बाळापूर (short circuit Sugarcane fire) : मौजे कान्हेगाव तालुका कळमनुरी येथील शेतकरी पांडुरंग चांदोजी माने गट नंबर 35 चिखली कान्हेगाव रस्त्यावर शेती असून शेतातून 33 kv दाती सबस्टेशन अंतर्गत 11KV मोठी विद्युत लाईन जाते. शेतामध्येच कान्हेगाव चिखली कट पॉईंट ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्यामुळे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामुळे आगी व धुराचे लोट तयार झाले. त्यामध्ये सुमारे तीन एकर शेतातील ऊसाला आग लागली असून उसाचे तीस गुंठे क्षेत्रावर उसाचे नुकसान झाले आहे असं डॉक्टर शिवाजी माने यांनी सांगितले.
आग विझवण्यासाठी गावातील ग्रामस्थ आजूबाजूचे शेतकरी यांनी धावा धाव केली व आग बुजवीण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतात सुद्धा आग पसरण्याची शक्यता होती... सध्या शेतामध्ये सोयाबीन काढणीला आलेले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता होती.शेतात पाणी देण्याचे काम चालू असताना देखील उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभरापासून उसाच्या लागवडी पासून वेगवेगळ्या टप्प्यावर खत निंदन भिजवन इत्यादी खर्च करून आयत्या उत्पन्नाच्या वेळेला विज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे असं शेतकरी रामदास पाटील वाघमारे यांनी सांगितले. सदर आग विझवण्यासाठी लाईन मन इंगोले यांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून आग विझवण्यासाठी शेतकरी दादाराव धुळे, सुभाष हिवाळे, गजानन पाटील वाघमारे, रामदास पाटील वाघमारे व शेतकरी यांनी धावपळ केली.
अगोदरच शेतामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असताना शेतकऱ्याला 'दुष्काळात तेरावा महिना' सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीला लागणारा खर्च बँकेचे कर्ज पिकाचे अल्प उत्पन्न यामुळे अगोदरच शेतकरी प्रचंड त्रासात आहे. त्यात आगाऊ संकटामुळे शेतकऱ्याचे फार नुकसान झाले आहे. तरी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून शेतकऱ्यांतून होत आहे.
शॉर्ट सर्किट ऊस आग
'दुष्काळात तेरावा महिना' शॉर्ट सर्किट मुळे आग लागून उसाचे नुकसान
short circuit Sugarcane fire: शेतामध्येच कान्हेगाव चिखली कट पॉईंट ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यामुळे आगी व धुराचे लोट तयार झाले. त्यामध्ये सुमारे तीन एकर शेतातील ऊसाला आग लागली..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
short circuit Sugarcane fire