Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > शेती

पिक विमा आंदोलन

शेतकर्‍यांच्या पिक विम्यासाठी आंदोलन; उबाठा शिवसैनिक आक्रमक

Pik Vima Andolan: परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी पिक विमा काढला होता, परंतु विमा कंपनीने अद्यापही रक्कम दिली नाही, आंदोलन सुरू केले आहे.


शेतकर्‍यांच्या पिक विम्यासाठी आंदोलन उबाठा शिवसैनिक आक्रमक

Pik Vima Andolan |

 

आ. डॉ. राहुल पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

परभणी (Pik Vima Andolan) : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांनी पिक विमा काढला होता. परंतु शेतकर्‍यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, सदरील प्रकरणामध्ये त्वरीत कारवाई करुन शेतकर्‍यांना पिक विमा द्यावा या मागणीसाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो पदाधिकारी, कार्येकर्त्यांंसह आक्रमक आंदोलन केले.

शासनाच्या निर्देशानुसार सोयाबिनचे ड्राय एज रेशो पध्दतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरील (Pik Vima Andolan) पिकासाठी शासनामार्फत योग्य त्या सुचना देवून ग्रीन वेट आणि ड्राय वेट असे दोन प्रकारचे वजन घेवून संभाव्य नुकसान काढत होते. सदरील सर्वेक्षणामध्ये शेतकर्‍यांना जास्तीत जास्त विमा भेटण्याकरीता शासनाने या योजनेचा अवलंब केला होता. परंतु विमा कंपनी ऑल इंडिया इन्शुरन्स यामध्ये शासनाचे ८५ टक्के शेअर असलेल्या कंपनीने सदरील पध्दतीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. सदरील प्रकरणामध्ये परभणी जिल्ह्यातील १८ मंडळे वगळण्यात आलेली आहेत. तसेच जिल्ह्यातील ९ पैकी ८ मंडळे या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी वंचित आहेत.

संबंधित तांत्रीक त्रुटी मुळे शेतकरी पिक विम्यापासून (Pik Vima Andolan) वंचित आहेत. ही बाब शासनाच्या निर्देशानुसार अवलंब करणे विमा कंपनी साठी बंधनकारक आहे. तरी देखील विमा कंपनी या निर्णयाला दुजोरा देवून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान करत आहे. या पुर्वी या संदर्भात शासनाला वारंवार निवेदन देण्यात आलेले आहे. तरी या बाबत योग्य ती कारवाई करुन हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावून शेतकर्‍यांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर आ.डॉ.राहुल पाटील, कल्याणराव रेंगे, महापौर सय्यद इकबाल, रविंद्र धर्मे, डॉ.विवेक नावंदर, जि.प.सदस्य पांडुरंग खिल्लारे, माजी जि.प.सदस्य गणेश घाडगे, संजय घाडगे, डॉ.अनिल कांबळे, कृउबा संचालक अरविंद देशमुख, फेजुल्ला पठाण, नंदु अवचार, रविंद्र देशमुख, अनिल डहाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्येकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related to this topic: