रिसोड हळदीचे कोठार

रिसोड ठरले महाराष्ट्राचे 'हळदीचे कोठार'; हळदीचे भाव २५-३० हजारांच्या उंबरठ्यावर, ११ हजार हेक्टरवर विक्रमी लागवड

Risod Storehouse of Turmeric: उत्तम नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि शेतकरी जनजागृतीच्या बळावर रिसोड तालुक्याने कृषी क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती..

रिसोड ठरले महाराष्ट्राचे 'हळदीचे कोठार'; हळदीचे भाव २५-३० हजारांच्या उंबरठ्यावर, ११ हजार हेक्टरवर विक्रमी लागवड

Risod Storehouse of Turmeric

रिसोड (Risod Storehouse of Turmeric) : उत्तम नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि शेतकरी जनजागृतीच्या बळावर रिसोड तालुक्याने कृषी क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भूमिपुत्र संघटनेच्या प्रभावी प्रयत्नांमुळे रिसोडची आता महाराष्ट्राचे 'हळदीचे कोठार' म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे. अवघ्या ३०० एकरवरून सुरू झालेला हा प्रवास आज ११ हजार हेक्टरवर पोहोचला असून, आज तालुकास्तरावर ही महाराष्ट्रातील विक्रमी हळद लागवड ठरली आहे.

भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी शेतकऱ्यांसाठी हळद हे हक्काचे व फायदेशीर नगदी पीक ठरावे, यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबवली. गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे 'हळद परिषदे'चे आयोजन करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, लागवड पद्धती आणि मार्केटिंगचे धडे दिले. या निरंतर प्रयत्नांमुळे आज तालुक्यातील हळदीचे क्षेत्र वाढून थेट ११ हजार हेक्टरवर गेले आहे.

यंदा विक्रमी दर, ३० हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी बाजारात हळदीला 13ते 15 हजार रुपये प्रतिक्विटलपर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र प्रशासनाच्या व बाजार समितीच्या उत्तम नियोजनामुळे हळदीच्या भावात मोठी वाढ झाली असून, सध्या प्रतिक्विटल २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी लवकरच हळद ३० हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडेल, असा दृढ विश्वास सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा, प्रययी पीक आणि व्यापार वृद्धी झाली. भूमिपुत्र संघटना आणि बाजार समितीच्या पुढाकाराने रिसोडच्या हळदीला 'येलो गोल्ड' ब्रँड म्हणून स्वतंत्र ओळख मिळाली आहे. हळद पिकाच्या यशस्वी लागवडीमुळे आणि चांगल्या बाजारभावामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. शेतकऱ्यांकडे पैसा खेळता राहिल्याने रिसोडच्या बाजारपेठेत उलाढाल वाढली असून दळणवळणालाही मोठा वेग आल्याचे स्थानिक व्यापारी सांगत आहेत. योग्य नियोजन आणि दूरदृष्टिकोनामुळे रिसोड तालुका आता राज्यासाठी हळदीचा प्रमुख 'हब' म्हणून उदयाला येत आहे.

संबंधित सामग्री

रिसोडमध्ये घंटागाड्या बंद; दिवाळीच्या तोंडावर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरण्याची भीती

रिसोडमध्ये घंटागाड्या बंद; दिवाळीच्या तोंडावर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरण्याची भीती

Risod Garbage Gadi: शहरातील कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्या आज बंद राहिल्यामुळे शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने घंटागाडी कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून...

Nov 04, 2026
घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले, तर हक्काचा 'पीएफ'ही खात्यात जमा नाही..दिवाळीत काम बंद करण्याचा इशारा!  

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले, तर हक्काचा 'पीएफ'ही खात्यात जमा नाही..दिवाळीत काम बंद करण्याचा इशारा!  

Risod Municipal Council Staff: रिसोड नगर परिषदेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे आता शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेची अत्यावश्यक सेवा पूर्णपणे कोलमडण्याची किंवा गंभीररीत्या..

Oct 28, 2026
पेनटाकळी धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडा; सभापती विष्णुपंत भुतेकर यांची जलसंपदामंत्र्यांकडे आक्रमक मागणी!

पेनटाकळी धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडा; सभापती विष्णुपंत भुतेकर यांची जलसंपदामंत्र्यांकडे आक्रमक मागणी!

Risod Market Committee: जिल्ह्यातील दुष्काळी व गंभीर परिस्थितीमुळे रब्बी हंगामात काढणीस आलेली शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याअभावी अक्षरशः वाळू लागली आहेत. भीषण संकटात सापडलेल्या पिकांना तातडीने जीवदान

Oct 26, 2026
रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात बनावट NA आदेश, 223 प्लॉट आणि झाडांच्या लागवडीचा दावा

रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात बनावट NA आदेश, 223 प्लॉट आणि झाडांच्या लागवडीचा दावा

रिसोडमध्ये भूसंपादन घोटाळ्याचा संशय; धरणाच्या बुडीत क्षेत्रात 223 प्लॉट आणि चंदन-आंब्याच्या लागवडीच्या नोंदींची चौकशी करण्याची मागणी.

Oct 16, 2026
दुष्काळाच्या संकटात पळसखेड, खडकी सदार तलावातून पाण्याचा अवैध उपसा सुरूच; ग्रामस्थांमधून तीव्र संताप

दुष्काळाच्या संकटात पळसखेड, खडकी सदार तलावातून पाण्याचा अवैध उपसा सुरूच; ग्रामस्थांमधून तीव्र संताप

Risod Illegal Water Extraction: ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत चालली असून पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही पळसखेड आणि खडकी सदार

Oct 15, 2026