Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

परभणी शेतकरी आत्महत्या

परभणीत कर्जाच्या विवंचनेत शेतकर्‍यांने घेतला गळफास

Parbhani Farmer Suicide: परभणीत, शेतकरी रामेश्वर काळे यांनी कर्जाच्या ताणामुळे गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाची नोंद ताडकळस पोलिसात करण्यात आली आहे.


परभणीत कर्जाच्या विवंचनेत शेतकर्‍यांने घेतला गळफास

Parbhani Farmer Suicide |

 

धानोरा काळे येथील घटना; ताडकळस पोलिसात नोंद

ताडकळस (Parbhani Farmer Suicide) : शेतातील नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत एका ३० वर्षीय तरुण शेतकर्‍याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे घडली. सदर प्रकरणी १० मे रोजी ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

परमेश्वर काळे यांनी खबर दिली आहे. रामेश्वर किशनराव काळे वय ३० वर्ष, असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. रामेश्वर काळे याने बँकेचे कर्ज कसे फेडावे, या ताणतणावात धानोरा काळे येथे आपल्या घरी लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत (Parbhani Farmer Suicide) आत्महत्या केली. सदर प्रकरणी ताडकळस पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास पोह. हिंगे करत आहेत.

चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
गंगाखेड :
चक्कर येऊन घराच्या अंगणात पडलेल्या इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी येथे घडली. उत्तम कंठीराम राठोड वय ४५ वर्ष, असे मयताचे नाव आहे. सदर प्रकरणी पिराजी राठोड यांच्या खबरीवरुन गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. जाधव करत आहेत.

Related to this topic: