कोरची (Paddy Pik kid Crisis) : कोरची तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दिलेली ओढ, त्यानंतर उशिरा झालेले रोवणी, वाढलेला उत्पादन खर्च आणि आता गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या ढगाळ व दमट वातावरण यामुळे तालुक्यात धान उत्पादन शेतकऱ्यांच्या अडचणीत मालिका संपण्याचे नाव घेत नाही. जोमाने वाढणाऱ्या दान पिकाचे खोड किड्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या उरलेल्या आशेवरही (Paddy Pik kid Crisis) संकटाचे सावट निर्माण झाले आहे. काही सणात बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव जाणवत असल्याचे पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना धावपळ सुरू झाली आहे.
खरीप हंगाम सुरू होताच पाऊस आणि पाठ फिरवल्याने तालुक्यात धान उत्पादकाची चिंता वाढली होती. पावसा अभावी रोवणीचे कामे खोडांबली आणि रोवणीचा कालावधी लांबत गेला. अखेर पावसाने काहीशी हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा आधारे कमी अधिक प्रमाणात रोमने उरकून घेतली वेळ निघून गेल्याने उशिरा राची पुरवणी शेतकऱ्यांच्या खत व कीटकनाशकांचा वापर वाढविला मात्र यंदा खत व औषधाच्या दरातही मागील वर्षाच्या तुलनेत चार पाच रुपयापर्यंत वाढ झाल्याने आधीच वाढलेल्या शेतीचा खर्चाचा आणखी भर पडली.
रोवणी उशीराची असली तरी नंतर पावसाने साथ दिल्याने धनाची पिके हळूहळू जोमाने धरू लागली हिरवेगार शिवार पाहून शेतकऱ्यांचा मनात पुन्हा उत्पादनाची आशा निर्माण झाली. वर्ष घराच्या कष्टाची चीज होईल आणि यंदाचा हंगाम काहीसा दिलासा देईल अशी अपेक्षा असतानाच मागील आठवडाभरापासून वातावरणाची पुन्हा रंग बदलला दिवसभर ढगाळ वातावरण तर दोन मधून रिमझिम पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला दमटपणासाठी पोषक ठरण्याऐवजी व रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अनेक शेतामध्ये दानाच्या खोडावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून काही ठिकाणी (Paddy Pik kid Crisis) बुरशीच्या जन्य रोगाशी ही लक्षणे जाणवत आहे पिकाची वाढ चांगली होत असताना किडाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या बहुतव्याची चिंता सतावत आहे पीक वाचवण्यासाठी पुन्हा औषधी फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात आणखी वाढवण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज
खोडकिड्यांचा प्रादुर्भाव कोणत्या पातळीवर आहे कोणत्या अवस्थेतील पिकावर त्यांना परिणाम अधिकच होत आहे आणि त्यावर नेमके कोणती उपयोजना करावी याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पातळीवर मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे केवळ असदांची नावे सांगण्यापेक्षा बांधीत शेताची पाहणी करून पिकाच्या अवस्थेनुसार योग्य उपाय सुचविणे आवश्यक आहे.
"कोरची तालुक्यात शेतकऱ्या शेतावर जावुन पाहणी करुन पंचनाम करुन शेतकऱ्या मार्गदन करून योग्य उपाय सुचविणे आवश्यक आहे अशी मागणी भारतीय जनता पाटीॅचे तालुका अध्यक्ष सदाराम नुरूटी यांनी मागणी केली आहे."
"तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश द्यावेत, शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनोद फगणीबाई भारत कोरेटी यांनी केली आहे."