Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

रस्ता बांधित शेतकरी

नागपुर शहर बाहय वळण रस्ता बांधित शेतकरी होणा-या अन्याया विरूध्द लढण्यास सज्ज

Road Affected Farmers:बाहयवळण रोड बांधत असलेल्या थर्ड आउटर रिंग रोडमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांनी पंचमुखी हनुमान मंडप, बाब्रुखेडा येथे भेटी घेतली. शेतकरी सेनाच्या गठबंधनेतून शासनाशी कायदेशीर संघर्ष


नागपुर शहर बाहय वळण रस्ता बांधित शेतकरी होणा-या अन्याया विरूध्द लढण्यास सज्ज

Road Affected Farmers |

पाटणसावंगी ( Road Affected Farmers) : न्यू नागपूर प्रकल्प व प्रस्तावित थर्ड आउटर रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची महत्त्वपुर्ण बैठक पंचमुखी हनुमान मंदीर बेल्लोरी (बाब्रुखेडा) येथे संपन्न होऊन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, दोन राज्यमंत्री असे चार मंत्री नागपुर जिल्हयात राहुन सुध्दा शेतक-यांना न्याय, हक्काकरिता संघर्ष करावा लागत असल्याने शेतक-यांनी जनप्रतिनिधी विषयी संताप व्यकत करित उत्तम पिक देणारी सुपिक शेत जमिन बांधित वडिलोपार्जित शेतक-यांच्या परिवारां च्या उपजिविकेचे साधन असल्याने शासन, प्रशासन अन्याय करेल तर बांधित शेतकरी संघर्ष करून सर्व स्तरावर लढा लढण्यास सज्जहोत आहे. 

शनिवार (दि.१३) जून २०२६ रोजी पंचमुखी हनुमान मंदिर बेल्लोरी (बाब्रुखेडा) येथे सायकाळी नागपुर महानगर प्रदेश विकास प्राधिकारण मार्फत नागपुर शहराभोवती बाहयवळण रस्त्या (थर्ड आऊटर रिंग रोड) विकसित करण्याकरिता बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या (Road Affected Farmers) बैठकीस सावनेर, पारशिवनी, कामठी, मौदा, कळमेश्वर तसेच नागपूर ग्रामीण परिसरातील विविध गावांतील शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते. बैठकीत सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी एकमताने “शेतकरी संघर्ष सेना” संघटनेची स्थापना केली. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटित व कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः न्यू नागपूर प्रकल्पाती ल बाधित शेतकऱ्यांना ज्या प्रकारचा मोबदला, पुनर्वस न सुविधा व सवलती देण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर थर्ड आउटर रिंग रोडमधील सर्व बाधित शेतक ऱ्यांनाही समान मोबदला व समान सवलती देण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. उपस्थि त शेतकऱ्यांनी “आम्ही आमची जमीन देणार नाही”, “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. विकासका मांना विरोध नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.

संघटनात्मक बांधणी मजबुत करण्यासाठी प्रत्येक गावातुन दोन प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रतिनिधी आपल्या गावातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न, सूचना व मागण्या संघटनेसमोर मांडतील तसेच पुढील पाठपुरावा आणि आंदोलनात्मक कार्यक्रमांमध्ये मह त्त्वाची भूमिका बजावतील. (Road Affected Farmers) शेतकरी संघर्ष सेना ही संघटना संपुर्ण परिसरातील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणुन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणार असुन आगामी काळात शासन व प्रशासनाशी संवाद साधुन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीस बाधित तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.