मानोरा पिक नुकसान

जिल्हयात ५ आमदार, २ खासदार, तरी शेतकऱ्यांच्या पदरात मदत कधी?

Manora Crop Damage: वाशिम जिल्हयात पावसाचा लांबलेला खंड आणि अपुरा पाऊस यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापशी यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पीक करपण्याची परिस्थिती

जिल्हयात ५ आमदार, २ खासदार, तरी शेतकऱ्यांच्या पदरात मदत कधी?

Manora Crop Damage

 

एक आमदार वगळता सर्व सत्ताधारी महायुतीचे तरीही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!
पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, तूर, कापूस करपले! 

मानोरा (Manora Crop Damage) : वाशिम जिल्हयात पावसाचा लांबलेला खंड आणि अपुरा पाऊस यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापशी यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पीक करपण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात ५ आमदार आणि २ खासदार असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेसचे एक आमदार अमित झनक वगळता सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधारी महायुतीचे असताना शासनस्तरावर (Manora Crop Damage) शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिक प्रभावी पाठपुरावा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्यासोबतच शासनाकडून मदतीचा ठोस निर्णय होणे आवश्यक असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

 पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या (Manora Crop Damage) पिकांचे तातडीने पंचनामे, पीकविमा दावे, आर्थिक मदत आणि दुष्काळसदृश परिस्थितीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. नुकसानग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवून मदतीसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून बांधावर भेटी दिल्या जात आहेत. मात्र, पाहणीनंतर नुकसानीचे अधिकृत मूल्यांकन, पंचनामे किती झाले, पीकविमा दाव्यांची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आणि शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे का, याबाबत शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती मिळणे अपेक्षित आहे.

असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर पाठपुरावा करून आणि प्रशासनाने वस्तुनिष्ठ नुकसान नोंदवून शेतकऱ्यांना लागू असलेल्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील ५ आमदार, २ खासदार आणि प्रशासनाचे यंत्रणा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणती ठोस पावले उचलतात, तसेच शासनाकडून मदतीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता नुकसानग्रस्त दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

टैग्स: Manora Crop Damage