लातूर बळीराजा

'यावे, राजे यावे!  जाताना बळीराजाला काहीतरी देऊन जावे..!'

Latur Farmer: 'यावे, राजे यावे!  जाताना बळीराजाला काहीतरी देऊन जावे..!' हे आर्त आहे लातूर जिल्ह्यातल्या तमाम बळीराजाचे... होय, यंदाच्या पावसाळ्यात जेमतेम सरासरी 50 ते 55 टक्केच पाऊस झाला.

'यावे, राजे यावे!  जाताना बळीराजाला काहीतरी देऊन जावे..!'

Latur Farmer

 

लातूरच्या तमाम बळीराजाचे आर्त!

महादेव कुंभार
लातूर (Latur Farmer) :
'यावे, राजे यावे!  जाताना बळीराजाला काहीतरी देऊन जावे..!' हे आर्त आहे लातूर जिल्ह्यातल्या तमाम बळीराजाचे... होय, यंदाच्या पावसाळ्यात जेमतेम सरासरी 50 ते 55 टक्केच पाऊस झाला. पावसाअभावी अनेक भागात पेरण्या झाल्या नाहीत. ज्या भागामध्ये पेरण्या झाल्या, तेथील पिकांची वाढ झाली नाही... जेथे पिकांची वाढ झाली ती पिके पावसाअभावी करपून गेली... ती इतकी करपली की आता पाऊस पडला तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांबद्दल सरकार पातळीवर कुठेही गंभीर दखल घेतली जात नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मराठवाडा मुक्ती दिनाच्या ध्वजारोहणासाठी लातूरला येत आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा वारसा असलेले शिवेंद्रसिंह राजे भोसले जिल्ह्यात आल्यानंतर शेतकऱ्याला कोणती भेट देतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

घाटी प्रदेश असलेला (Latur Farmer)  लातूर जिल्हा मुळातच अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो. गतवर्षी सरासरीपेक्षा पाऊसमान जास्त झाले आणि पिके वाया गेली. मात्र शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा ही मिळाला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नुकसान भरपाईही मिळाली नाही. यंदा पावसाच्या बाबतीत नेमके उलटे झाले आहे. सरासरीच्या केवळ 57 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मराठवाडा विभागाच्या तुलनेत हा पाऊस जवळपास 17 मिमी. पाऊस कमी आहे. मराठवाड्यात सर्वात डेंजर झोन मध्ये असलेला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा होय.

मात्र या जिल्ह्यातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे पाहायला सरकारला वेळ दिसत नाही. सप्टेंबर महिन्यात केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर मध्ये पीकभरणीचा मोसम असतो. मात्र पाऊसच न झाल्याने जिल्ह्यातल्या सर्वाधिक पीक असलेल्या सोयाबीनला शेंगाच भरत नाही. फुलगळ होऊन पिके करपून गेली आहेत. भयान ऊन पडत असून तीव्र उन्हामुळे सकाळी दहापासूनच रस्ते सुनसान होत आहेत. उष्माघातामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बांधावरले गवतही करपून गेले आहे. जनावरांचे करायचे काय? असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांना पडला आहे. याकडे गांभीर्याने पाहिला सरकार तयार नाही. सत्ताधारी आमदार केवळ आणि केवळ दुष्काळी परिस्थिती असल्याचा कांगावा करत आहेत, मात्र हा सांगावा सरकारच्या कानी पडत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत.
'शेतकरी सुखी, रयत सुखी तर राजा सुखी', असे विचार आणि धोरण छत्रपती शिवाजी महाराज यांचे होते. म्हणून त्यांना रयतेचे राजे म्हटले जात असे.

छत्रपतींच्या घराण्याचे वारस म्हणून आपल्याकडे तमाम शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवाय आपण लातूरचे पालकमंत्री आहात. लातूर आपल्या घोषणा ऐकण्यासाठी आतूर झाले आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण जिल्ह्यात येत आहात, आपले स्वागत आहे. यावे, राजे यावे अन् जाताना बळीराजाला काहीतरी देऊन जावे..! हे आर्त लातूर जिल्ह्यातल्या तमाम बळीराजाचे आहे. 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले । अवघेचि झाले देहब्रह्म', अशी अनुभूती व्यक्त करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या महाराष्ट्राचे आपण मंत्री आहात... हे आर्ट आपल्या मनी ही प्रकाशावे, एवढीच माफक अपेक्षा जिल्ह्यातल्या बळीराजाची आहे.

टैग्स: Latur Farmer

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
‘ट्रिगर-१’वरून लातूर जिल्ह्यात जोरदार घमासान!

‘ट्रिगर-१’वरून लातूर जिल्ह्यात जोरदार घमासान!

लातूर जिल्ह्यात ‘ट्रिगर-१’च्या यादीवरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील यादी बनावट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, तर दुष्काळसदृश परिस्थितीवर शेतकऱ्यांचे प्रश्न.

Sep 19, 2026
बैलजोडी खरेदी करून गावी चालत जात असलेल्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल! 

बैलजोडी खरेदी करून गावी चालत जात असलेल्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल! 

Latur Farmer Crime: लातूर जिल्ह्यातील अरजखेडा येथील शेतकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केली आणि गावाकडे पाठीमागे जाताना त्यांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी बैलांचे गोरक्षण

May 25, 2026