कानसूर शिवार ऊस जळून खाक

परभणीत कानसूर शिवारात शॉर्टसर्किटमुळे २५ एकर ऊस जळून खाक

Kansoor Shivar sugarcane burnt: कानसूर शिवारात महावितरणच्या कृषी वाहिनीवरील विद्युत तारांच्या घर्षणातून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शेतकर्‍यांचा तब्बल २५ एकर ऊस जळून खाक

परभणीत कानसूर शिवारात शॉर्टसर्किटमुळे २५ एकर ऊस जळून खाक

Kansoor Shivar sugarcane burnt

महावितरणच्या कृषी वाहिनीवरील तारांच्या घर्षणातून आग; शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान

पाथरी (Kansoor Shivar sugarcane burnt) : तालुक्यातील कानसूर शिवारात महावितरणच्या कृषी वाहिनीवरील विद्युत तारांच्या घर्षणातून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शेतकर्‍यांचा तब्बल २५ एकर ऊस जळून खाक झाला. बुधवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने काही वेळातच संपूर्ण ऊसपिकाला विळखा घातला. या (Kansoor Shivar sugarcane burnt) घटनेत दोन्ही शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कानसूर येथील महिला शेतकरी जयश्री शिवाजीराव शिंदे आणि तुकाराम भारतराव शिंदे यांच्या गट क्रमांक २७४ मधील शेतात उसाचे पीक उभे होते. बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास महावितरणच्या कृषी वाहिनीवरील विद्युत तारांच्या घर्षणातून ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांमुळे उसाच्या फडाने पेट घेतला. ऊस सुकलेला असल्याने आग वेगाने पसरली आणि बघता बघता दोन्ही शेतकर्‍यांचे सुमारे २५ एकरांतील ऊसपीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.  

आगीची तीव्रता लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी पाथरी येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. समोरून तांत्रिक अडचणीचे कारण सांगण्यात आल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाची मदत उपलब्ध झाली नसल्याची माहिती स्थानिक शेतकर्‍यांनी दिली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले. डोळ्यांदेखत कष्टाने वाढविलेले ऊसपीक जळून खाक होत असताना ते वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता आल्या नाहीत अशी हतबलता शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

आगीच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत
पाथरी तालुक्यात मागील महिनाभरापासून ऊस जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून विद्युत तारांमधील शॉर्टसर्किट हे अनेक घटनांमागील प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. आधीच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना अशा घटनांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. वर्षभर पिकाची जोपासना करून उत्पन्नाच्या अपेक्षेने उभे केलेले पीक आगीत नष्ट होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

विद्युत तारांची देखभाल, संभाव्य धोके रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आग लागल्यानंतर तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच, (Kansoor Shivar sugarcane burnt) नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.