Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

आखाडा बाळापूर

Farmer committed suicide: शेतातील नापीकी व कर्जाच्या चिंतेतून शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

कळमनुरी तालुक्यात शेतकरी रमेश मिरासे यांनी नापिकी व वाढत्या कर्जाच्या चिंतेतून आत्महत्या केली.


farmer committed suicide शेतातील नापीकी व कर्जाच्या चिंतेतून शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

आखाडा बाळापूर (Farmer committed suicide) : कळमनुरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. तालुक्यातील कस्बे धावंडा येथील शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे पिके वाया जात असल्याने पिककर्ज कसे फेडावे या चिंतेत (Farmer committed suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ मार्च रोजी सायंकाळी याबाबत आकस्मात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कस्बे धावंडा येथील शेतकरी रमेश यादवराव मिरासे (५४ ) यांनी सततच्या निसर्गाच्या चक्रामुळे शेतातील नापिकी व यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके वाया गेल्याने बँकेकडून घेतलेले पिककर्ज कसे फेडावे या चिंतेने २ मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात (Farmer committed suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटने बाबत १३ मार्च रोजी गणेश यादवराव मिरासे यांच्या माहीतीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, बिटप्रमुख राजेश घोंगडे करत आहेत. चालू मार्च महिन्यात कळमनुरी तालुक्यातील साळवा, बाभळी व कस्बे धावंडा तिन शेतकरी आत्महत्या घटना घडल्या आहेत. वाढत्या (Farmer committed suicide) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली पाहिजे.

Related to this topic: