Farmer suicide Case: शेतकरी रायसिंग मंगु राठोड ( वय ६० ) याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दि. ८ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घराच्या मागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
सोमनाथनगर येथील घटना
मानोरा (Farmer suicide Case) : तालुक्यातील सोमनाथनगर येथील शेतकरी रायसिंग मंगु राठोड ( वय ६० ) याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दि. ८ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घराच्या मागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर असे की, सोमनाथनगर येथील शेतकरी रायसिंग राठोड यांच्या नावाने २ एकर शेती आहे. मागील तीन ते चार वर्षापासून सततची नापिकीमुळे शेती, बचत गटाचे, उसनवारी व सावकारी कर्ज अंगावर होते. कर्जाच्या विवंचनेत नेहमी चिंताग्रस्त (Farmer suicide Case) राहत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कुटुंबात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार असुन कर्ज काढून तीन मुलींचे लग्न केले आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी,( दि. ८ जुलै ) सकाळच्या सुमारास घरामागील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मनमिळावू स्वभावाचे शेतकरी रायसिंग राठोड यांनी गळफास घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी मर्गचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहे.