हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल १०,०७१ रुपये विक्रमी भाव!

Hingoli Bazar Samiti: हिंगोली शहरातील औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) मधील प्रसिद्ध 'राधा जिनिंग' येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल १०,०७१ रुपये विक्रमी भाव!

Hingoli Bazar Samiti

हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : हिंगोली शहरातील औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) मधील प्रसिद्ध 'राधा जिनिंग' येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. हंगामाच्या पहिल्याच दिवशी कापसाला १०,०७१ रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी आणि समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

माळ धामणी येथील शेतकरी अशोक  व्यवहारे यांचा फेटा बांधून सत्कार

​दसऱ्याच्या मुहूर्तावर राधा जिनिंग येथे कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले माळ धामणी येथील शेतकरी अशोक व्यवहारे यांनी हंगामातील पहिल्या कापूस विक्रीचा आणि फेट्याचा मान मिळवला. याप्रसंगी हनुमानदासजी मुंदडा यांच्या हस्ते शेतकरी अशोक व्यवहारे यांचा पारंपरिक फेटा बांधून, शाल व श्रीफळ देऊन भावूक आणि सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

या (Hingoli Bazar Samiti) शुभारंभ प्रसंगी हिंगोली शहरातील प्रमुख व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोक मुंदडा. बाबुशेठ बडिया. रमेश मुंदडा. सतीश लोहिया. सावरमल अग्रवाल. सुनील बगडिया. संजय जयस्वाल. सुभाष मुंदडा. निशांत डोडल. प्रकाशचंद सोमानी. सुभाष मुंदडा. आदींसह. शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी कापसाला १०,०७१ रुपयांचा चांगला दर मिळाल्याने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व उपस्थितांनी व्यक्त केला.

टैग्स: Hingoli Bazar Samiti

संबंधित सामग्री

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहु पोहचला ४ हजार ६५ रुपयांवर

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहु पोहचला ४ हजार ६५ रुपयांवर

Hingoli Bazar Samiti: जिल्ह्यात दुष्काळ असल्याने शेतमालाच्या बाजारभावात तेजीचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार  समितीमध्ये गव्हाने  चार हजार ६५ रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला.

Oct 28, 2026
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाय्यक सचिव महिला बडतर्फ

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाय्यक सचिव महिला बडतर्फ

Hingoli Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोलीच्या सहाय्यक सचिव श्रीमती जे. आर. भंडारी (ज्योती राजेंद्र भंडारी) यांना सेवेतून कायम बडतर्फ करण्याचा आदेश बाजार समितीचे प्रशासक सुरेखा फुपाटे

Sep 09, 2026