Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

आवकाळी पाऊस नुकसान

आवकाळी पावसासह,गारपीटीने 'हळद' पिकाचे नुकसान

Rainfall damage: रिसोड तालुक्यातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासापासून हळद पिकाकडे वळले. 2 एप्रिल रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने हळद पिकाच्या सुकणाऱ्या हळदीचे मोठे नुकसान केले.


आवकाळी पावसासहगारपीटीने हळद पिकाचे नुकसान

Rainfall damage |

कु-हा,आसोला येथिल शेतक-यांचे नुकसान

रिसोड (Rainfall damage) : रिसोड तालुका हा हळद पिकाचे उत्पन्न घेणारा तालुका म्हणून पुढे येत आहे.विशेष म्हणजे कु-हा,आसोला,जवळा,मांडवा, मोहजाबंदी,भर जहागीर सह आदी गावातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून हळद पिकाकडे वळले आसतांनी हळद पिक शेतावर सुकण्यावेळीच ता.2 एप्रिल च्या रात्री झालेल्या आवकाळी पावसासह,गारपीटीने सुकत आसलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शेतकरी पारंपारिक पिक पध्दतीला बगल देत नानाविध पिकाची लागवड करीत आहे.परंतु कधी आसवानी,तर कधी सुलताणी संकटाने येथिल शेतक-यांचे हिरवे स्वप्न धुळीस मिसळत आसल्याचे विदारक चित्र दिसुन येते.मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा (Rainfall damage) अंदाज खरा ठरला पणे नेमका हळद पिकाच्या मुळावरच आला.तालुक्यातील कु-हा,आसोला,भर जहागीर, मांडवा,जवळा,मोहजाबंदीसह आदी भागातील शेतक-यांनी हळद पिकाची काढणी करून योग्य ती प्रक्रिया करीत शेतावर हजारो क्विंटल हळद सुकण्यासाठी पांगुण ठेवली होती.परंतु ता.2 एप्रिल च्या रात्री अनेक गावा मध्ये अवकाळी पावसासह,गारपीट झाल्याने पिवळी हळद पांढरी पडल्याने अतोनात नुकसान झाल्याची माहीती.कु-हा येथिल शेतक-यांनी दिली.या नुकसानाची प्रशासनाद्वारे योग्य पंचनामे करीत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

देविदास नागरे (हळद उत्पादक शेतकरी कु-हा
वन्यप्राण्यांच्या त्रासापोटी आमच्या परीसरामध्ये हळद पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले, हळद पिकाची काढणी करीत शेतावर पसर पडलेल्या हळदीवर अवकाळी पावसासह, गारपीट (Rainfall damage) झाल्याने आता हळद पांढरी पडलेली दिसत आहे.याचा संबंधित विभागाने पंचनामा करून योग्य ती मदत करावी ही विनंती.

Related to this topic: