शेतकरी महिला आत्महत्या

दुष्काळीच्या कारणातून गोजेगाव येथील शेतकरी महिलेची विषारी औषध पिवून शेतात आत्महत्या

Female Farmer Suicide: दुष्काळी परिस्थितीने गांगारून गेलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील ६५ वर्षीय वयोवृध्द शेतकरी महिलेने शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना

दुष्काळीच्या कारणातून गोजेगाव येथील शेतकरी महिलेची विषारी औषध पिवून शेतात आत्महत्या

Female Farmer Suicide

हिंगोली (Female Farmer Suicide) : दुष्काळी परिस्थितीने गांगारून गेलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील ६५ वर्षीय वयोवृध्द शेतकरी महिलेने शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील कमलबाई कांदे या महिलेस गोजेगाव शिवारामध्ये चार एक्क शेती असुन शेतीमध्ये सोयाबीन व कापसाचे पिक घेतले आहे. मागील २० ते २५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिक कोमेजून जात आहेत. मागील काही दिवसापासून कांदे कुटूंबीय शेतातील आखाड्यावर राहण्याकरीता गेले होते. डोळ्यादेखत पीक कोमेजून जात असल्याने भविष्यातील चिंता निर्माण झाली होती. खरिप हंगामाचे उत्पादन कसे येणार व रब्बी हंगामातील पेरणी कशी होणार असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत होता. ९ सप्टेंबर रोजी बुधवारी कमलबाई कांदे यांचे पती जनावर घेऊन गावाकडे निघाले होते.

यावेळी कमलबाईंनी पतीला समोर पाठवून शेतामध्ये विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्यांना चक्कर येऊन त्या कापसाच्या शेतामध्ये कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत कमलबाई घरी आल्या नसल्याने कुटूंबीयांनी शेतामध्ये शोध मोहीम सुरू केली. यावेळी कमलबाई शेतातील पिकात जमीनीवर कोसळलेल्या अवस्थेत दिसून येताच त्यांना तात्काळ औंढा नागनाथ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून कमलबाई कांदे यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबतची माहिती औंढा ना. पोलिसांना मिळाल्यावर पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्यासह रविकांत हरकाळ, किशोर पारीसकर यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली. कमलबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, असा परिवार आहे.  कमलबाई कांदे यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत औंढा ना. पोलिसात गुरूवारी माहिती घेईपर्यंत आकस्मात मृत्यूची नोंद झाली नव्हती.

टैग्स: Female Farmer Suicide