मानवत शेतकरी आत्महत्या

मायक्रो फायनान्सचे कर्ज; तणावात घेतला गळफास

Farmer Suicides in Manwat: मायक्रो फायनान्स च्या कर्जाचे हप्ते कसे फेडू या ताणात ३२ वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

मायक्रो फायनान्सचे कर्ज; तणावात घेतला गळफास

Farmer Suicides in Manwat

 

परभणीतील मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील घटना
अकस्मात मृत्युची नोंद...!

परभणी/मानवत (Farmer Suicides in Manwat) : मायक्रो फायनान्स च्या कर्जाचे हप्ते कसे फेडू या ताणात ३२ वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मानवत पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अंकुश लाडाणे यांनी खबर दिली आहे. लहु माणिक लाडाणे वय ३२ वर्ष, असे मयताचे नाव आहे. २२ ऑक्टोबरच्या रात्री अकरा ते २३ ऑक्टोबर च्या पहाटे पाच या दरम्यान केकरजवळा शेतात सामायीक धुर्‍यावरील लिंबाच्या झाडाल लहु लाडाणे यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस, केकरजवळाचे पोलीस पाटील तुलसीदास लाडाणे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. 

लहु लाडाणे यांनी मायक्रो फायनान्सच्या कर्जाचे हप्ते कसे फेडू, या (Farmer Suicides in Manwat) ताणात शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. मानवत पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि. भारत नलावडे, पतंगे, खंडेराव राऊत करत आहेत.