कळमनुरी (Selsura Farmer suicide) : तालुक्यातील सेलसुरा येथील एका शेतकर्यावर बँकेसह सावकाराचे कर्ज होते. तसेच यंदा पिकासाठी म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या दत्तराव या शेतकर्याने २१ सप्टेंबरला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील शेतकरी दत्तराव घुगे यांच्याकडे बँक व खाजगी सावकाराचे कर्ज आहे. यावर्षी सुगी चांगली आल्यावर आपण परतफेड करून व मुलींचे शिक्षण योग्य रीतीने करूत अशा मनस्थितीत असताना यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतातील पिके पाण्या अभावी करपली. कर्ज परतफेड कसे करावे या विवंचनेत असताना त्यांनी याबाबतची परिवाराला अनेक वेळा माहितीही दिली होती. २१ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता आपले राहते घरी दत्तराव घुगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.
या (Selsura Farmer suicide) घटनेची माहिती मिळतात स.पो.नि विकास आडे, सपोनि एस. पी. सांगळे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयतावर कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सेलसुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत दत्तराव घुगे यांचे पश्चात आई, पत्नी, भाऊ, तीन मुली असा परिवार होता.
सेलसुरा शेतकरी आत्महत्या
सेलसुरा येथील नापिकीला कंटाळून शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
Selsura Farmer suicide: तालुक्यातील सेलसुरा येथील एका शेतकर्यावर बँकेसह सावकाराचे कर्ज होते. तसेच यंदा पिकासाठी म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या दत्तराव
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Selsura Farmer suicide
टैग्स:
Selsura Farmer suicide