Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

शेतकरी मोटारपंप केबल चोरी

देवजना येथे १४ शेतकऱ्यांच्या मोटारपंपच्या केबल चोरीस, शेतकऱ्यांमध्ये संताप

Farmer motor pump cable theft


देवजना येथे १४ शेतकऱ्यांच्या मोटारपंपच्या केबल चोरीस शेतकऱ्यांमध्ये संताप

Farmer motor pump cable theft |

आखाडा बाळापूर (Farmer motor pump cable theft) : आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीतील देवजना शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत तब्बल १४ शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारपंपच्या तांब्याच्या केबल कापून लंपास केल्या. कयाधू नदीपात्रात पाण्यात टाकलेल्या मोटारपंपच्या केबल चोरीस गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शेतकरी सदानंद रामराव कल्याणकर यांच्या मोटारपंपची ३२० फूट लांबीची, ६४०० रुपये किमतीची केबल चोरीस गेली. त्याचप्रमाणे रामराव भुजंगराव कल्याणकर यांची १५० फूट, ३००० रु., भुजंगराव विठ्ठल कल्याणकर यांची १५० फूट, ३००० रु., विठ्ठलराव भुजंगराव कल्याणकर यांची १०० फूट, २००० रु., विलास भुजंगराव कल्याणकर यांची १०० फूट, २००० रु. आणि विलास बाबुराव सावंत यांची २०० फूट, ४००० रु. किमतीची केबल चोरट्यांनी कापून नेली.

याशिवाय संतोष किशनराव कल्याणकर यांची १२० फूट, २४०० रु., गोविंद नथुराम कल्याणकर यांची १५० फूट, ३००० रु., कैलास कल्याणकर यांची १०० फूट, २००० रु., दीपक कल्याणकर यांची १५० फूट, ३००० रु., साहेबराव शिंदे यांची १५० फूट, ३००० रु., शेषराव कल्याणकर यांची १५० फूट, ३००० रु., बाबुराव कल्याणकर यांची १५० फूट, ३००० रु., मारोती कल्याणकर यांची १०० फूट, २००० रु. आणि पंजाबराव कल्याणकर यांची १४० फूट, २८०० रु. किमतीची केबलही चोरीस गेली आहे. एकूण १४ शेतकऱ्यांचे मिळून शेकडो फूट लांबीचे आणि हजारो रुपये किमतीचे केबल चोरट्यांनी लंपास केले.

देवजना परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र एकाच दिवशी १४ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.