परभणी ऊस जळून खाक

परभणीत तिडीपिंपळगावात शॉर्ट सर्कीटने तीन एकर ऊस जळून खाक

Parbhani Sugarcane Burn: तालुक्यातील तिडीपिंपळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिला शेतकरी राधाबाई किशनराव घूमरे यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला.

परभणीत तिडीपिंपळगावात शॉर्ट सर्कीटने तीन एकर ऊस जळून खाक

Parbhani Sugarcane Burn

 

महावितरणचा हलगर्जीपना; शेतकर्‍याचे १० लाख रुपयांचे नुकसान

सेलू (Parbhani Sugarcane Burn) : तालुक्यातील तिडीपिंपळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिला शेतकरी राधाबाई किशनराव घूमरे यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत त्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

तिडीपिंपळगाव येथील गट क्रमांक २३१ मध्ये राधाबाई घूमरे यांनी दुष्काळी परिस्थितीत पाण्याची व्यवस्था करून मोठ्या कष्टाने ऊस पीक (Parbhani Sugarcane Burn) जगवले होते. मात्र, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले. डोळ्यांदेखत ऊस जळून खाक झाल्याने घूमरे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेनंतर राधाबाई घूमरे यांनी सेलू पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदन दिले आहे. जळालेल्या उसाचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना अशा घटनांचा मोठा आर्थिक फटका (Parbhani Sugarcane Burn) सहन करावा लागत आहे. महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून महिला शेतकर्‍याला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित मदत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.