बार्शीटाकळी तांदुळ काळाबाजार

पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने बार्शीटाकळी तालुक्यात तांदुळाचा काळाबाजार

Barshitakali Rice Black Market: बार्शीटाकळी तालुक्यात महसूल व पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने तांदूळ खरेदी विक्री व वाहतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून, बार्शीटाकळी पोलिसांनी सोळा चाकी ट्रक

पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने बार्शीटाकळी तालुक्यात तांदुळाचा काळाबाजार

Barshitakali Rice Black Market

 

35 ते 36 लाखाचे साहित्य जप्त
35 टन तांदूळव 16 चाकी ट्रकचा समावेश
पुरवठा विभागाची भूमिका संशयास्पद

बार्शीटाकळी (Barshitakali Rice Black Market) : बार्शीटाकळी तालुक्यात महसूल व पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने तांदूळ खरेदी विक्री व वाहतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून, बार्शीटाकळी पोलिसांनी सोळा चाकी ट्रक सह अंदाजे 35 टन असा अंदाजे 35 ते 36 लाखाचा साठा जप्त केला आहे. या गंभीर घटनेची माहिती महसूल व पुरवठा विभागाला दिल्यानंतरही त्यांनी पाहणी करून पंचनामा केल्यानंतर पोलिसात फिर्याद केली नसल्याने पोलिसांना तपास करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारची माहिती समोर आली आहे.

बार्शीटाकळी पोलिसांनी मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबरला सकाळी अंदाजे सात ते साडेसात वाजता च्या सुमारास, (Barshitakali Rice Black Market) बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आनंद कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय फराज शेख, मंगेश महाजन ईश्वरपातोंड व गणेश पाटील यांनी बार्शीटाकळी ते कापशी रोडवर सिंदखेड ते बार्शीटाकळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दयावान कापूस फॅक्टरी जवळ सोळा चाकी ट्रक क्रमांक एम एच 37 टि. 23 81चे चालक मोहम्मद सिद्धीक खान मोहम्मद हिराखान, क्लीनर जावेद खान रुफिसखान रा.शिखरा जि. शिरी मध्यप्रदेश, हे बुलढाणा जिल्ह्यातील रोहिणखेड येथून कारंजा कडे ट्रक राशन चा तांदूळ विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे  निदर्शनास आल्यानंतर,बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला ट्रक व तांदूळ अंदाजे किंमत 35 ते 36 लाख रुपयाचे साहित्य जप्त केले.

अतिशय महत्त्वाचे म्हणजेया गंभीर प्रकरणात पोलिसांनी चालक व क्लिनर ला ट्रक मधील तांदुळाच्या खरेदी विक्रीच्या पावत्या, हया आपणाकडे असल्यास तपासासाठी देण्यात याव्यात. अशा प्रकारची विचारणा केली असता त्यांनी आपल्याजवळ कोणत्याच प्रकारची बिले नाहीत .अशी माहिती दिली होती असेही सूत्रांनी आवर्जून सांगितले. या गंभीर घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ (Barshitakali Rice Black Market) बार्शीटाकळी महसूल विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांना माहिती दिल्यानंतर त्यांचे सह पुरवठा निरीक्षक सुरज जगताप यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामा केला. मात्र पोलिसात कोणत्याच प्रकारची फिर्याद दिली नव्हती.

बार्शीटाकळी तहसीलचे जबाबदार महसूल अधिकारी व पुरवठा निरीक्षण आनंद गुप्ता  यांनी या गंभीर प्रकरणात तात्काळ फिर्याद दाखल करणे आवश्यक व बंधनकारक होते .परंतु त्यांनी तसे का केले नाही. हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला दिनांक 28 ऑक्टोबरला रात्री सात वाजेपर्यंत या गंभीर प्रकरणात कोणतीच तक्रार किंवा फिर्याद दाखल केली नसल्याने तपास करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पुरवठा विभागाने पंचनामा केल्यानंतर तात्काळ जर फिर्याद दाखल केली असती तर पोलिसांना या घटनेतील मुख्य सूत्रधार अर्थात तांदूळ कोणत्या शेतकऱ्याकडून कोणीखरेदी केला, कोणत्या गावाला व कोणाकडे विक्री करता पाठविला जातो, कोणत्या शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी केला, बुलढाणा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ शेतकऱ्याकडून खरेदी केला आहे काय, असल्यास वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक व क्लीनर जवळ त्यांची बिले उपलब्ध का नव्हती. पुरवठा विभागाने तात्काळ या गंभीर प्रकरणात फिरत का दाखल केली नाही, या गंभीर प्रकारातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याला वेळ मिळत पुरवठा विभाग देत असल्याच्या शंका कुशंका निर्माण होत आहेत.

या गंभीर घटनेतील जप्त केलेला तांदूळ अन्न व पुरवठा विभाग किंवा महसूल विभागाच्या अधिनस्त असलेल्या प्रयोगशाळेत नमुने तपासणी करता पाठविण्याचे कारण सांगून पुरवठा निरीक्षण अधिकारी वेळ निभाऊन नेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या गंभीर प्रकारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊन प्रकरण दाबण्यात येत असल्याच्या उलट सुलट खमंग चर्चा काल सकाळपासून बार्शीटाकळी तालुक्यात सर्वत्र होत आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्याची गरज
या गंभीर प्रकरणात पुरवठा विभागाने तात्काळ पोलिसा तक्रार का केली नाही. याची तात्काळ सखोल चौकशी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महसूल विभागाकडून दोशीला वाचविण्याचे प्रयत्न?

पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता यांना याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे सांगितले होते. असे मत बार्शीटाकळीचे तहसीलदार राजेंद्र कापशीकर यांनी व्यक्त केले. जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नेवार यांना या घटनेबाबत काय कारवाई केली. अशा प्रकारची विचारणा केली असता सदर घटनेची माहिती मला मिळाली असून अद्याप पर्यंत माझ्याकडे लेखी स्वरूपात अहवाल आला नाही. परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ पोलिसात पुरवठा विभागाने तक्रार का केली नाही याबाबत विचारणा केली असता वेळ निभावून नेला आहे.