Banana Plantation Poisoning: तालुक्यातील खाजमापूरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेतील झाडे व केळीच्या घडांवर तणनाशक आणि ॲसिड, रसायनाची फवारणी करून पीक जाळण्याचा अघोरी प्रकार
खाजमापूरवाडी येथील भयंकर प्रकार देशोन्नतीने आणला होता चव्हाट्यावर
ॲड. चंद्रकांत देवणे
वसमत (Banana Plantation Poisoning) : तालुक्यातील खाजमापूरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेतील झाडे व केळीच्या घडांवर तणनाशक आणि ॲसिड, रसायनाची फवारणी करून पीक जाळण्याचा अघोरी प्रकार घडला होता या प्रकाराला देशोन्नतीने वाचा फोडली होती मानवी असूयेचा हा भयंकर प्रकार देशोन्नतीच्या बातमीनंतर प्रचंड चर्चेचा विषय झाला होता. या प्रकरणात कुरुंदा पोलिसांनी गांभीर्याने शोध मोहीम राबवली असून यातील"विषारीदोस्त"पोलिसांच्या रडारवर असून लवकरच आरोपी गजाआड होतील अशी चिन्हे आहेत.
वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी येथील शेतकरी उमेश बाबाराव मुके यांच्या केळीच्या बागेत अज्ञात व्यक्तीने केळीच्या झाडांवर तसेच घडांवर विषारी रसायनाची फवारणी करून केळीची बाग जाळण्याचा प्रकार केला होता केळीच्या बागेमध्ये शौचालयात वापरणारे ॲसिडच्या कॅन तणनाशक चे डबे व फवारणीसाठीचा स्प्रे इत्यादी वस्तू सापडल्या होत्या. देशोन्नतीने हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता देशोन्नतीच्या बातमीनंतर अघोरी कृत्य करणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या संबंधित शेतकऱ्याने कुरुंदा पोलिसात तक्रार दिली होती.
कुरुंदा पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली व कोणताही ठोस पुरावा नसताना (Banana Plantation Poisoning) केळीच्या शेतात सापडलेल्या औषधाचे डबे कॅन यावरून तपास सुरू झाला एका डब्यावर मार्करने हाताने लिहिलेले "के 195 "हे दुकानदाराचे कोडवर्ड दिसून आले त्यावरून सदर कोडवर्ड कोण्या औषध विक्रेत्याची आहे हे शोधून काढण्यात आले वसमत येथील विक्रेत्याकडे पोलीस पोहोचले दुकानदाराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले व त्यावरून संशयितआरोपी निष्पन्न झाला आहे द्वेष भावनेतून शेतकऱ्याचे पिक जाळणारी ती आघोरी मानसिकता कोणाची हे पोलीस लवकरच जाहीर करणार आहेत.
विषारी दोस्त कोण?
कुरुंदा पोलिसांनी या प्रकरणात शोधमोहीम राबवली घटनास्थळावरअधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी भेट दिली संबंधित औषधी विक्रीच्या दुकानाचा शोध घेतला दुकानावरील सीसीटीव्ही फुटेज वरून ते औषध खरेदी अघोरी प्रवृत्ती शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे प्राथमिक माहितीनुसार संबंधित अघोरी प्रकार करणारा हा संबंधित शेतकऱ्याच्या जवळचाच व सोबत राहणाराच असल्याचे समोर येत आहे त्यावरून असे आघोरी विषारी मित्र , विषारी प्रवृत्ती आपल्या अवतीभवती आणि समाजात वावरत असतात हे सुद्धा यानिमित्ताने समोर येत आहेत.