Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > देश

व्हाइट हाऊस गोळीबार

डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव धोक्यात? व्हाइट हाऊसजवळ झाडल्या 30 गोळ्या

White House Firing: व्हाइट हाऊसच्या बाहेर 30 गोळ्या झाडल्या गेली. संशयित कोणत्याही सुरक्षा कर्मचारीला जखमी झाल्याची माहिती नाही. ट्रम्प सुरक्षित राहिला, परिसरात 40 मिनिटे लॉकडाउन.


डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव धोक्यात व्हाइट हाऊसजवळ झाडल्या 30 गोळ्या

White House Firing |

वॉशिंगटन (White House Firing) : अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील व्हाइट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. एका संशयिताने व्हाइट हाऊसजवळ अंदाजे 30 गोळ्या झाडल्या, ज्यामुळे घबराट पसरली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) व्हाइट हाऊसमध्ये होते.

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "व्हाइट हाऊसजवळ गोळीबाराचे आवाज ऐकू आले. ही घटना संध्याकाळी 6 वाजल्यानंतर (ET) घडली, जेव्हा एक व्यक्ती तपासणी नाक्याजवळ आला. त्याने आपल्या बॅगेतून शस्त्र काढून अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सिक्रेट सर्व्हिसने त्या व्यक्तीवर गोळीबार केला असला तरी, तेथे उपस्थित असलेल्या एका नागरिकालाही गोळी लागली."

ही (White House Firing) घटना व्हाइट हाऊस परिसराच्या अगदी बाहेर, 17 वा स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू नॉर्थवेस्टच्या चौकात घडली. संशयिताला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि या गोळीबारात कोणताही सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती नाही.

व्हाइट हाऊस परिसरात लॉकडाऊनसारखी परिस्थिती

गोळीबारानंतर व्हाइट हाऊस परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तेथे उपस्थित असलेल्या पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. एएफपीच्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी व्हाईट हाऊसकडे जाणारे मार्ग बंद केले आणि नॅशनल गार्डच्या सैनिकांनी एएफपीच्या एका पत्रकाराला त्या परिसरात प्रवेश करण्यापासून रोखले.

नॉर्थ लॉनवरील पत्रकारांना तेथून पळून जाऊन व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेच्या खोलीत आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले. (White House Firing) व्हाईट हाऊसच्या आत असलेल्या पत्रकारांना आपापल्या जागीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी त्यांना "खाली वाकून बसण्याच्या" सूचना दिल्या. तो परिसर 40 मिनिटे लॉकडाउनसारख्या स्थितीत होता.