टीव्ही चॅनेल थेट प्रक्षेपण

टीव्ही चॅनेलच्या मनमानीला केंद्र सरकारचा लगाम! नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

TV Channel Live Broadcast: बातम्या प्रसारित करण्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा मजकूर किंवा दृश्ये दाखवता येणार नाहीत, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारने खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेलना दिला आहे...

टीव्ही चॅनेलच्या मनमानीला केंद्र सरकारचा लगाम! नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

TV Channel Live Broadcast

 

दहशतवादी कारवायांच्या थेट प्रक्षेपणापासून AI च्या वापरापर्यंत सरकारचे कडक निर्देश

नवी दिल्ली (TV Channel Live Broadcast) : बातम्या प्रसारित करण्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा मजकूर किंवा दृश्ये दाखवता येणार नाहीत, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारने खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेलना दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी टीव्ही चॅनेलना कार्यक्रम संहितेचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) अधिनियम, 1995 आणि संबंधित नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.

दहशतवादविरोधी मोहिमांचे थेट प्रक्षेपण (TV Channel Live Broadcast) , हिंसक दृश्यांचे प्रसारण, गुन्ह्यांच्या घटनांचे अतिरंजित वृत्तांकन, महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत पीडितांची ओळख उघड करणे तसेच प्रक्षोभक चर्चांचे आयोजन या मुद्द्यांवर मंत्रालयाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, बातम्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करताना अचूकता आणि विश्वासार्हता जपण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नियमभंगाच्या तक्रारींनंतर मंत्रालयाची कठोर भूमिका

केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मधील नियम 6 अंतर्गत निर्धारित कार्यक्रम संहितेच्या पालनाबाबत ही (TV Channel Live Broadcast) सूचना जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम संहितेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आंतरविभागीय समितीने (IDC) काही चॅनेलवरील प्रसारित सामग्रीबाबत आक्षेप नोंदवले आहेत.

काही चॅनेलवर नियमांच्या मूळ उद्देशाशी विसंगत असलेली सामग्री प्रसारित होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. तसेच, एकाच विषयाशी संबंधित समान बातम्या आणि दृश्ये विविध चॅनेलवर वारंवार दाखवली जात असल्याचेही आढळले. त्यामुळे केवळ नियमांचे वरवर पालन न करता त्यांच्या मूळ उद्देशानुसार जबाबदार पत्रकारिता करण्याची गरज मंत्रालयाने अधोरेखित केली आहे.

दहशतवादविरोधी मोहिमांचे LIVE प्रक्षेपण निषिद्ध

सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांचे थेट प्रक्षेपण (TV Channel Live Broadcast) करण्यास मनाई असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मधील नियम 6(1)(p) नुसार अशा मोहिमांचे थेट प्रक्षेपण प्रतिबंधित आहे. मोहिमेची समाप्ती होईपर्यंत चॅनेलनी अधिकृत अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या वेळोवेळीच्या माहितीपुरतेच वृत्तांकन मर्यादित ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामागील प्रमुख उद्देश म्हणजे सुरक्षा दलांच्या हालचाली किंवा मोहिमेशी संबंधित संवेदनशील माहिती सार्वजनिक होऊन अभियानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, हा आहे.

तसेच, आवश्यकतेनुसार छायाचित्रे आणि व्हिडिओंवर वेळ व तारीख नमूद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे जुनी दृश्ये सध्याच्या घडामोडींची असल्याप्रमाणे दाखवून प्रेक्षकांची दिशाभूल होण्याची शक्यता कमी होईल. या (TV Channel Live Broadcast) विषयावर मंत्रालयाने यापूर्वी 12 जून 2024 आणि 26 एप्रिल 2055 रोजीही सूचना जारी केल्या होत्या.

AI च्या वापरावरही लक्ष

बातम्यांच्या निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह AI चा वापर करताना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. ग्राफिक्स आणि आभासी वृत्तनिवेदन यांसारख्या कामांसाठी AI चा वापर करता येऊ शकतो; मात्र तो सहाय्यक साधन म्हणूनच वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. AI च्या वापरामुळे बातम्यांची अचूकता, सत्यता आणि संवेदनशीलता यांच्याशी तडजोड होता कामा नये, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होऊ नये, यासाठी संपादकीय तपासणी आणि सामग्रीचे पुनरावलोकन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

हिंसक दृश्ये आणि प्रक्षोभक चर्चांवरही निर्बंध

गुन्हेगारी घटनांचे सनसनाटी वृत्तांकन, हिंसक दृश्यांचा अनावश्यक वापर आणि प्रक्षोभक चर्चांमुळे प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामांचाही मंत्रालयाने विचार केला आहे. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांच्या बातम्यांमध्ये पीडितांची ओळख उघड होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बातम्या संकलित करणे, संपादन, निर्मिती, प्रसारण आणि वितरण या सर्व टप्प्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यक्रम संहितेची माहिती असणे आवश्यक आहे.

यासाठी नियमित प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्यासही प्रोत्साहन देण्यात आले आहे. एकूणच, बातम्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच प्रसारणात जबाबदारी, अचूकता आणि संवेदनशीलता राखण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यामुळे टीव्ही चॅनेलना आता बातम्यांचे सादरीकरण करताना नियमांचे पालन आणि संपादकीय जबाबदारी यांना अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे.

संबंधित सामग्री

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले...

Nov 06, 2026
'हातात राज्यघटना, कृती मात्र विरोधात'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

'हातात राज्यघटना, कृती मात्र विरोधात'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Save Democracy, Remove Anarchy: राज्यघटनेच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या काँग्रेसची कृती मात्र घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी

Nov 05, 2026
फटाके फोडण्यास, आकाशकंदील उडविण्यास बंदी; दुष्काळाचे भान ठेवा, साधेपणाने दिवाळी साजरी करा!

फटाके फोडण्यास, आकाशकंदील उडविण्यास बंदी; दुष्काळाचे भान ठेवा, साधेपणाने दिवाळी साजरी करा!

Maharashtra Diwali Safety Rules: शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करताना सामाजिक भान राखून अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे...

Nov 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

Flood-Affected Farmers Financial Aid: राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Nov 05, 2026