Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > देश

अस्मिता

दुःख, वेदना, अडीअडचणी, अडथळे व आजार यांची उत्पत्ती मनापासूनच होते, तसेच अद्भूत, अकल्पनीय, अविश्वसनीय, अशक्यप्राय व असंभव अशी कामेसुद्धा मनच घडवून आणते.


अस्मिता

मनाची या गावा

(Self Awareness)दुःख, वेदना, अडीअडचणी, अडथळे आजार यांची उत्पत्ती मनापासूनच होते, तसेच अद्भूत, अकल्पनीय, अविश्वसनीय, अशक्यप्राय असंभव अशी कामेसुद्धा मनच घडवून आणते. मन हे पाण्यासारखे आहे. त्यात तुम्ही जो रंग टाकता त्या रंगाचे ते होऊन जाते. त्यात मीठ टाकायचे, की साखर हे आपल्या हाती आहे.

आपण जसे विचार करतो तसेच आपले आयुष्य असते; हे जरी खरे असले, सोपे वाटत असले तरीही ते पाहिजे तेवढे सोपे नाही. कारण आपल्या माईंडमध्ये क्षणाक्षणाला विचारांचा तांडव सुरू असतो, विचारांचे काहूर माजलेले असते. विचार ज्ञान हे अर्थहीन, अर्थशून्य असतात जोपर्यंत ते कृतीत येऊन त्याला सातत्याची जोड मिळत नाही. आपले विचार हे १०० टक्के शुद्ध, वास्तव सत्य नसतात(Self Awareness); ते आपल्या धारणेन, भावनेने बाधित झालेले असतात. म्हणूनच माईंडमध्ये विचारांचा कल्लोळ, गोंधळ परस्परविरोधी विचार असतात. म्हणूनच त्यांना अमलात आणणे कठीण असते. अशा कृतीहीन, अर्थहीन विचारांनी आपले आयुष्यही अर्थहीन होऊन जाते. स्थितप्रज्ञ होऊन साक्षीभावाने त्यांचे अवलोकन केल्यास ते धारणा भावनांपासून मुक्त होऊन त्यांचा वेग मंदावतो; विचारांचे तांडव थांबून ते स्थिर, शुद्ध, पवित्र होत आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देत आपल्याला एक ध्येय, स्वप्न दृष्टी देतात. ते व्हिजन म्हणजेच आपल्या आयुष्याची ब्लू प्रिंट असते. तो नकाशाच आपले पाऊल बाहेर काढून कृती करण्यास बाध्य करत त्याप्रमाणे आपले आयुष्य घडवतो. शंभर टक्के शुद्ध विचार देव, संत-महात्मे, महापुरुषांना सुद्धा शक्य नसतात; झाले तरीही कलेक्टिव्ह माईंडची नकारात्मकता, अशुद्धता त्यात अडचणी, आव्हाने, संघर्ष, असफलता आणतातच. त्यावेळी त्यातून त्यांचे ध्येय, व्हिजनच त्यांना बरोबर व्यवस्थित मार्ग काढून देतात. हे आपल्याला आतापर्यंत ज्ञात असलेल्या इतिहासातून समजून येते. आध्यात्मिकता भौतिकता ह्या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; परंतु आपण अध्यात्मिकता म्हणजे नीतिमत्ता भौतिकता म्हणजे चंगळवाद म्हणत आपण आपणासच अपूर्णत्व प्रदान करतो माणसा-माणसात दरी निर्माण करतो.

ज्याप्रमाणे शरीर मन एक असते, त्याचप्रमाणे अध्यात्मिकता भौतिकताही एकच असतात. मागील पाचशे वर्षांपासून त्या दोघांना एकत्र जोडत एका सुखद जीवनाचे स्वप्न वास्तविकतेत उतरताना आपण बघत आहोत; ज्यात अध्यात्मिकता ही प्रत्येकाच्या भौतिक गरजा पूर्ण करत प्रत्येकाच्या हाताला काम, पोटाला अन्न, अंगाला कपडा देत जीवन सुंदर बनवत आहे. ज्या पैशाला नकारात्मकतेनी बघितल्या जाते, तोच हे सर्व घडवून आणत असतो. सुख-सुविधांच्या किंमती तुलनेत आपल्या आवाक्यातच आहेत, परंतु त्या पैशातूनच संशोधनाला मदत होऊन विकास होत असतो.

आधुनिक जगाच्या निर्मितीमध्ये तेंव्हा आपण पारतंत्र्यात असूनही आपले अमूल्य असे योगदान आहे, हे आपल्यालाही माहिती नाही. जागतिक स्तरावर भारताला आकाशाला गवसणी घालणाऱ्या, उंचीवर पोहोचविणाऱ्याचा जाज्वल्य इतिहासही आपल्याला माहिती नाही. आपण तिसऱ्या जगातील निम्न दर्जाचे नागरिक नसून जगाचे नेतृत्व करणारे आहोत. ५जी सारखे संपूर्ण आधुनिक विज्ञान ज्याच्यावर उभे आहे, तो मार्ग एका भारतीयाने निर्माण केलेला आहे. त्यांना आपण फक्त 'वनस्पती सजीव आहे, तिलाही भावना असतात' एवढ्या एकाच छोट्याशा गोष्टीसाठी ओळखतो; वास्तविकतेत ते आधुनिक जगाच्या भौतिकशास्त्राचा पाया रचणारे महान भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक आहेत. हे आज आपल्याला, आपल्या देशवासीयांना सांगायचे काम पडते, ही एक शोकांतिका आहे. जगदीशचंद्र बोस केंब्रिजमधून शिकून आलेले; त्यांना इंग्रजांपेक्षा कमी वेतन दिले जात होते, या भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी तीन वर्षे वेतनच घेतले नाही. शेवटी इंग्रजांएवढेच वेतन त्यांना द्यावे लागले. पारतंत्र्यात संशोधनाला कुठलेही पाठबळ नसताना, सुविधांचा अभाव असताना 'जुगाड टेक्नॉलॉजी' म्हणजेच मोठे-मोठे यंत्र कमी खर्चात देशी बनावटीने बनवायचे, त्याच टेक्नॉलॉजीने आपण चंद्रयान मंगळयान पाठवून जगाला आश्चर्यचकित केले, त्याच जुगाड टेक्नॉलॉजीचे ते जनक. ज्यांनी आज भारतात दिसणाऱ्या प्रत्येक वैज्ञानिक संस्थेचा पाया आपला पदरमोड करून, पत्नी अबला बोस यांच्या सहकार्याने रचलेला आहे.

मिलिमीटर साईजच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचा शोध लावून त्यांनी मार्कोनीच्याआधी तीन-चार भिंतींच्या पार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाठवून बेल वाजवून दाखवली, दारूगोळा पेटवून दाखवला; परंतु मुक्त विज्ञानासाठी त्यांनी त्याचे पेटंट घेतले नाही. परंतु त्या संदेशवहनाचे व्यावसायिक महत्त्व ओळखून, रेडिओ लहरीने संदेश पाठवून मार्कोनीने त्याचे पेटंट आपल्या नावावर केले. परंतु आज वैज्ञानिकांसोबतच संपूर्ण जग त्याचे जनक जगदीशचंद्र बोसच आहेत हे मान्य करते. पारतंत्र्यातही आपली अस्मिता जागृत करून अस्मितेच्या पिढ्यानपिढ्या निर्माण करणाऱ्यांचा विसर पडता कामा नये.

डॉ. संदीप मनोहरराव डवंगे
एमबीबीएस डीसीएच एमडी (बालरोगतज्ज्ञ) समाजसेवी, प्रेरकवक्ता, हिप्नोटिस्ट, NLP कोच
नांदुरा,
मो. नं.-९३२५७६८०५८