Seemanchal Express

आईच्या कुशीतून निसटले ९ महिन्यांचे बाळ; धावत्या सीमांचल एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू

सीमांचल एक्स्प्रेसमधून प्रवास करताना ९ महिन्यांचे बाळ आपत्कालीन खिडकीतून खाली पडले. २३ तासांच्या शोधानंतर फैजुल्लाहपूरजवळ मृतदेह आढळला.

आईच्या कुशीतून निसटले ९ महिन्यांचे बाळ; धावत्या सीमांचल एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू

Seemanchal Express

आईच्या कुशीतून बाळ आपत्कालीन खिडकीतून खाली पडले; फैजुल्लाहपूर स्थानकाजवळ GRP-RPFची शोधमोहीम

नवी दिल्ली/प्रयागराज : धावत्या रेल्वेतून प्रवास करताना खिडकीजवळ लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वारंवार केले जाते. मात्र, दिल्लीहून बिहारकडे निघालेल्या सीमांचल एक्स्प्रेसमध्ये एका कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. आईच्या कुशीत दूध पिताना झोपलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा हातातून तोल गेला आणि ते धावत्या रेल्वेच्या आपत्कालीन खिडकीतून खाली पडले. उत्तर प्रदेशातील फैजुल्लाहपूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेनंतर तब्बल २३ तासांनी बाळाचा मृतदेह झुडपांमध्ये आढळून आला.

दिल्लीतील सितापुरी परिसरात राहणारे मोहन कुमार हे पत्नी काजल आणि नऊ महिन्यांच्या मुलासह बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील सालौना गावाकडे निघाले होते. आनंद विहारहून सीमांचल एक्स्प्रेसच्या S-1 डब्यातून त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांना ६१ आणि ६४ क्रमांकाचे बर्थ मिळाले होते.

पोलिसांच्या तपासानुसार, प्रवासादरम्यान मोहन कुमार शौचालयात गेले होते. त्यावेळी काजल आपल्या बाळाला दूध पाजत होती. दूध पिताना तिला झोप लागली. त्याचदरम्यान तिच्या कुशीत असलेले बाळ मागे सरकले आणि आपत्कालीन खिडकीतून धावत्या रेल्वेबाहेर पडले.

मोहन कुमार परतल्यानंतर बाळ दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पती-पत्नीने संपूर्ण डब्यात बाळाचा शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. बाळ रेल्वेतून खाली पडल्याची शक्यता लक्षात येताच मोहन यांनी आपत्कालीन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखल्याचे सांगण्यात आले.

प्रयागराज येथे रेल्वे पोहोचल्यानंतर दांपत्याने GRPकडे घटनेची माहिती दिली. त्यानंतर GRP आणि RPFच्या पथकांनी रेल्वे मार्गालगत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही बाळाचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फैजुल्लाहपूर स्थानकाजवळील झुडपांमध्ये बाळाचा मृतदेह आढळून आला.

दाट झाडी आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे शोधमोहीम राबविण्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही तपासात समोर आले.

मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे आई-वडिलांना रात्री स्थानकावरच थांबावे लागले. या प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली.

रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांना खिडकीपासून दूर ठेवणे आणि आपत्कालीन खिडक्यांजवळ विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

संबंधित सामग्री

‘मोगॅम्बो मोदी’ म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; सीजेपी आंदोलनात काँग्रेसही सहभागी होणार

‘मोगॅम्बो मोदी’ म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; सीजेपी आंदोलनात काँग्रेसही सहभागी होणार

Rahul Gandhi: दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Oct 11, 2026
अभिजीत दीपके आजीच्या निधनानंतर गावी रवाना; CJP चा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच

अभिजीत दीपके आजीच्या निधनानंतर गावी रवाना; CJP चा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच

CJP संस्थापक अभिजीत दीपके गावी रवाना; सौरव दास, आशुतोष रांका आणि ध्रुव राठी यांची सुटका. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरूच राहणार.

Oct 11, 2026
‘खरी लढाई आता सुरू झाली’; ‘आम्ही मागे हटणार नाही’ सुटकेनंतर CJP चा मोदी सरकारला इशारा

‘खरी लढाई आता सुरू झाली’; ‘आम्ही मागे हटणार नाही’ सुटकेनंतर CJP चा मोदी सरकारला इशारा

अभिजीत दीपकेसह CJP च्या ३ नेत्यांची सुटका. आशुतोष रांका आणि सौरव दास यांचे दिल्ली पोलीस व मोदी सरकारवर गंभीर आरोप; आंदोलन सुरूच राहणार.

Oct 11, 2026
दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा दणका? शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका!

दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा दणका? शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका!

दिल्ली आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे कडक निर्देश! मेट्रो, रेल्वे, इंटरनेट सेवा आणि आंदोलकांच्या ताब्याबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस.

Oct 11, 2026
ध्रुव राठीचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; ‘मला ताब्यात घेतले नाही, माझे अपहरण केले’

ध्रुव राठीचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; ‘मला ताब्यात घेतले नाही, माझे अपहरण केले’

ध्रुव राठीचा दिल्ली पोलिसांवर अपहरणाचा आरोप; २२ ते २३ तास संपर्क रोखल्याचा दावा करत मोदी सरकारवर टीका.

Oct 11, 2026