Saudi Arabia Oil Pipeline

सौदीची तेल पाइपलाइन बंद; कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर, भारताच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता

सौदी अरेबियातील ड्रोन हल्ल्यानंतर १,२०० किमी लांबीची पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइन तात्पुरती बंद झाली. कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर पोहोचल्याने भारताच्या इंधन दरांबाबत चिंता वाढली.

सौदीची तेल पाइपलाइन बंद; कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर, भारताच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता

Saudi Arabia Oil Pipeline

ड्रोन हल्ल्यानंतर १,२०० किमी लांबीची पूर्व-पश्चिम पाइपलाइन तात्पुरती बंद; होर्मुझनंतर पर्यायी तेलमार्गही संकटात

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा फटका जागतिक तेलपुरवठ्याला बसत असतानाच भारताच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सौदी अरेबियाने ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची वाहतूक करणारी सुमारे १,२०० किलोमीटर लांबीची पूर्व-पश्चिम पाइपलाइन तात्पुरती बंद केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०९ डॉलरपर्यंत पोहोचल्या असून भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आधीच तेलवाहतुकीसाठी अडचणीची ठरली आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियाची पूर्व-पश्चिम पाइपलाइन हा होर्मुझला वळसा घालणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग मानला जात होता. या मार्गाने सौदीच्या तेलाची वाहतूक पश्चिम किनाऱ्यावरील यान्बू बंदरापर्यंत केली जाते आणि तेथून भारतासह इतर आशियाई देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो.

गुरुवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पाइपलाइन बंद करण्यात आल्याची माहिती सौदी ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे. रियाध आणि मदिना परिसरात भारताला तेलपुरवठा करणाऱ्या या मार्गाला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मदिनाच्या दक्षिणेकडील पाइपलाइनच्या एका भागातून काळा धूर निघत असल्याचे फोटोही समोर आले आहेत.

हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची आणि पाइपलाइनचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. नुकसानीचे नेमके स्वरूप आणि त्याचा परिणाम याचा सध्या अंदाज घेतला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने किंवा देशाने स्वीकारलेली नाही. मात्र, बगदाद आणि रियाध या दोन्ही देशांनी हा हल्ला इराकमधून झाल्याचे म्हटले आहे. या परिसरात इराणसमर्थित सशस्त्र गट सक्रिय असल्याची माहिती आहे.

सौदी अरेबिया हा भारतासाठी कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे. इराण युद्धापूर्वी सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सौदीकडून भारताला दररोज सुमारे ७ लाख ४३ हजार बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा होत होता. फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान हा पुरवठा घटून दररोज सुमारे ४ लाख ४० हजार बॅरलवर आला.

अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम सौदीच्या तेल उत्पादनावरही झाल्याचे सांगितले जात आहे. जगातील प्रमुख तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील कच्च्या तेलाचे उत्पादन ३६ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात सौदीच्या तेल निर्यातीत ४० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलवाहू जहाजांची वाहतूक थांबलेली असताना सौदीची पूर्व-पश्चिम पाइपलाइन भारतासाठी महत्त्वाचा पर्यायी पुरवठामार्ग ठरत होती. मात्र, या पाइपलाइनलाच ड्रोन हल्ल्याचा फटका बसल्याने भारतासह अनेक आशियाई देशांच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलरच्या पुढे गेल्याने त्याचा थेट परिणाम भारताच्या इंधन बाजारावर होण्याची शक्यता आहे. तेलपुरवठ्यातील अडथळे कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे पुढील काळात आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील हालचालींकडे भारताचे विशेष लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex 900 अंकांनी कोसळला, Nifty 22,300 च्या खाली

शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex 900 अंकांनी कोसळला, Nifty 22,300 च्या खाली

शेअर बाजारात मोठी घसरण झाली. Sensex 873 अंकांनी तर Nifty 310 अंकांनी घसरला. RBI धोरण, FII विक्री, US Bond Yield आणि तेलाच्या दरांचा बाजारावर दबाव.

Oct 08, 2026
कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर

कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर

RBIने रेपो रेट ५.५०% केला. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या EMIवर परिणाम होण्याची शक्यता.

Oct 07, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; ४ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; ४ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण. चार दिवसांत सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले.

Sep 29, 2026
डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026