सौदी अरेबिया हवाई हल्ला

सौदी अरेबियात विमानतळ-तेल प्रकल्पावर हल्ला; 1 भारतीयासह 3 जणांचा मृत्यू, 10 जखमी

Saudi Arabia Airstrike: सौदी अरेबियातील विमानतळ आणि तेल प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत.

सौदी अरेबियात विमानतळ-तेल प्रकल्पावर हल्ला; 1 भारतीयासह 3 जणांचा मृत्यू, 10 जखमी

Saudi Arabia Airstrike

 

दम्माम विमानतळावर हल्ला; शायबा तेल क्षेत्रातील ड्रोनचे अवशेष पडल्याने दोघांचा मृत्यू

रियाध/ सऊदी अरब (Saudi Arabia Airport Oil Facility Attack) : सौदी अरेबियातील विमानतळ आणि तेल प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. या घटनांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सौदी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. दुसरीकडे, अरामकोच्या शायबा तेल क्षेत्रात ड्रोनला हवाई संरक्षण यंत्रणेने रोखल्यानंतर त्याचे अवशेष पडून दोन जणांचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले.

सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील प्रांतात घडलेल्या या (Saudi Arabia Airstrike) घटनांनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने परिसरात अनेक ड्रोन हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे. हल्ल्यांनंतर काही विमानांचे मार्गही बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दम्माम विमानतळावरील ताज्या हल्ल्याची जबाबदारी हुथी बंडखोरांनी अद्याप अधिकृतपणे स्वीकारलेली नाही.

दम्माम विमानतळावर हल्ला; एकाचा मृत्यू, आठ जखमी

सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या (GACA) माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करण्यात आले. या (Saudi Arabia Airstrike) हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विविध देशांतील नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यात विमानतळाचेही नुकसान झाले आहे.

दम्माम हे फारसच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेले असून, बहरीन आणि कतार या देशांच्या जवळ आहे. सौदी अरेबियाच्या दृष्टीने हा परिसर सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हल्ल्यानंतर विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या Flightradar24 या संकेतस्थळानुसार, काही विमानांना पर्यायी मार्गांनी वळवण्यात येत होते.

अरामकोच्या शायबा तेल क्षेत्रात ड्रोन रोखला

सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, सरकारी तेल कंपनी अरामकोच्या शायबा तेल क्षेत्रातील प्रक्रिया केंद्राला लक्ष्य करण्याचा एका ड्रोनद्वारे प्रयत्न करण्यात आला. मात्र, हवाई संरक्षण यंत्रणेने हा ड्रोन रोखला. त्यानंतर ड्रोनचे अवशेष पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये फिलिपाइन्स आणि नेपाळच्या नागरिकांचा समावेश आहे. या (Saudi Arabia Airstrike) घटनेत एक भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले. ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे एका कंत्राटदाराच्या वाहनालाही आग लागली. या घटनेनंतरही तेल क्षेत्रातील कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले.

अमेरिकेकडून कर्मचाऱ्यांना सौदी अरेबिया सोडण्याची परवानगी

सौदी अरेबियातील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या काही राजनैतिक अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह देश सोडण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.

नागरी विमानतळांसह इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले ही गंभीर सुरक्षाविषयक चिंता असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. पश्चिम आशियात इराण, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्याशी संबंधित लष्करी तणाव वाढत असताना अमेरिकेच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सौदी अरेबियातील महत्त्वाच्या विमानतळ आणि तेल सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याने या (Saudi Arabia Airstrike) भागातील सुरक्षा परिस्थितीबाबत चिंता वाढली आहे. विशेषतः ऊर्जा प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर अशा हल्ल्यांचे संभाव्य परिणाम लक्षात घेता, परिस्थितीवर जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

टैग्स: Saudi Arabia Airstrike