Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > देश

ऋषभ पंत

ऋषभ पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम!

Rishabh Pant Record: श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत मैदानावर पुनरागमन करताच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने विक्रमांची नवी नोंद केली आहे. पंतने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी


ऋषभ पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम

Rishabh Pant Record |

 

परदेशी मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक

भारतीय कसोटी संघाच्या 94 वर्षांच्या इतिहासात रचला अद्भूत विक्रम

नवी दिल्ली/ कोलंबो (Rishabh Pant Record) : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत मैदानावर पुनरागमन करताच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने विक्रमांची नवी नोंद केली आहे. पंतने माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडत परदेशी किंवा तटस्थ मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पंतने (Rishabh Pant Record) ही ऐतिहासिक कामगिरी केली. परदेशी आणि तटस्थ मैदानांवरील कसोटी सामन्यांमध्ये पंतच्या धावांची संख्या आता 2,500 हून अधिक झाली आहे. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 41.68 इतकी आहे.

धोनीला मागे टाकत पंत नंबर वन

एमएस धोनीने परदेशी आणि तटस्थ मैदानांवरील कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून 2,496 धावा केल्या होत्या. पंतने (Rishabh Pant Record) हा आकडा मागे टाकत या विक्रमावर आपले नाव कोरले. या यादीत फारुख इंजिनिअर 1,209 धावांसह तिसऱ्या, तर सय्यद किरमाणी 1,109 धावांसह चौथ्या आणि किरण मोरे 901 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

दुखापतीनंतर पंतचे दमदार पुनरागमन

कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतसाठी परिस्थिती कठीण होती. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याचा शॉर्ट चेंडू पंतच्या डाव्या हाताला जोरात लागला. चेंडू स्क्वेअरच्या मागे खेळण्याचा प्रयत्न करताना तो थेट पंतच्या हातावर आदळला. दुखापतीनंतर पंत वेदनेने त्रस्त दिसत होता. भारतीय संघाचा फिजिओ लगेच मैदानावर दाखल झाला. (Rishabh Pant Record) पंतच्या हातावर आधी आइस पॅक लावण्यात आला आणि त्यानंतर टेपही बांधण्यात आली. मात्र वेदना कमी न झाल्याने पंतला मैदान सोडावे लागले. त्यावेळी तो 15 चेंडूत 3 धावांवर खेळत होता. भारताच्या डावातील 58व्या षटकात पंत फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला आणि रिटायर्ड हर्ट झाला.

हाताला सूज असतानाही झंझावाती अर्धशतक

दुखापतीनंतर दुसऱ्या दिवशी पंतने (Rishabh Pant Record) पुन्हा मैदानात पाऊल ठेवले. हाताला सूज आणि वेदना असतानाही त्याने आक्रमक फलंदाजी करत धडाकेबाज अर्धशतक झळकावले. दुखापतीवर मात करत केलेल्या या दमदार पुनरागमनामुळे पंतच्या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर धोनीचा विक्रम मोडत त्याने भारतीय कसोटी क्रिकेटच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.