Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > देश

Redmi 17 5G

Xiaomi चा स्वस्त 5G फोन येतोय; 7900mAh बॅटरीसह Redmi 17 5G ची 3 सप्टेंबरला भारतात एंट्री

Xiaomi भारतीय स्मार्टफोन बाजारात आपल्या किफायतशीर Redmi मालिकेतील नवा 5G स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे.


xiaomi चा स्वस्त 5g फोन येतोय 7900mah बॅटरीसह redmi 17 5g ची 3 सप्टेंबरला भारतात एंट्री

45W फास्ट चार्जिंग, Snapdragon 4 Gen 5 प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा; 120Hz डिस्प्ले मिळणार

Xiaomi भारतीय स्मार्टफोन बाजारात आपल्या किफायतशीर Redmi मालिकेतील नवा 5G स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. Redmi 17 5G या नावाने येणाऱ्या या फोनच्या लॉन्चची तारीख कंपनीने जाहीर केली असून, 3 सप्टेंबर रोजी भारतात हा फोन लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे या डिव्हाइसमध्ये तब्बल 7900mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Redmi India च्या अधिकृत X हँडलवरून फोनच्या लॉन्चची माहिती शेअर करण्यात आली आहे. कंपनीने बॅटरी क्षमतेसोबतच फोनच्या डिझाइनशी संबंधित काही माहितीही दिली आहे. Redmi 17 5G च्या मागील बाजूस प्रीमियम व्हेगन लेदर फिनिश देण्यात येणार आहे.

45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट

कंपनीच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, Redmi 17 5G मध्ये 7900mAh बॅटरीसोबत 45W फास्ट चार्जिंग सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे 45W चार्जर फोनच्या बॉक्समध्येच दिला जाणार आहे. याशिवाय हा स्मार्टफोन 22.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट करणार आहे.

Redmi 17 5G मध्ये 50MP कॅमेरा

Redmi 17 5G साठी Xiaomi ने आपल्या अधिकृत पोर्टलवर स्वतंत्र पेज तयार केले आहे. कंपनीने फोनमध्ये नवीन डिझाइन देण्यात आल्याचे म्हटले आहे. उपलब्ध माहितीनुसार, स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे.

Snapdragon 4 Gen 5 प्रोसेसर

परफॉर्मन्ससाठी Redmi 17 5G मध्ये Snapdragon 4 Gen 5 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या प्रोसेसरसह येणारा हा भारतामधील पहिला स्मार्टफोन असेल.

हा फोन तीन रंगांमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. यामध्ये Eternal Orange, Absolute Black आणि Endless Blue या रंगांचा समावेश आहे.

120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले

Redmi 17 5G च्या डिस्प्लेबाबत अद्याप सर्व तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आगामी काळात कंपनीकडून या स्मार्टफोनच्या आणखी वैशिष्ट्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, Redmi 17 5G ची भारतातील अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लॉन्चच्या दिवशी फोनची नेमकी किंमत आणि उपलब्धतेबाबत अधिक माहिती समोर येईल.