Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > देश

बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन

‘बलुचिस्तान स्वातंत्र्य दिना’च्या घोषणेने पाकिस्तान हादरला...

Balochistan Independence Day: ११ ऑगस्टला बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन म्हणून पाकिस्तानी राष्ट्रवादी गटांनी आयोजन केले. त्यामुळे बलुचिस्तान मागणी वाढली, तर सुरक्षेच्या धोके आणि आंतरराष्ट्रीय स्तर


‘बलुचिस्तान स्वातंत्र्य दिना’च्या घोषणेने पाकिस्तान हादरला

Balochistan Independence Day |

११ ऑगस्टपूर्वी सुरक्षा यंत्रणांची वाढली प्रचंड धावपळ

इस्लामाबाद (Balochistan Independence Day) : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील स्वातंत्र्यवादी चळवळीने पुन्हा वेग घेतला असून, काही बलुच राष्ट्रवादी संघटनांनी ११ ऑगस्ट हा ‘बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. या घोषणेमुळे पाकिस्तानमध्ये राजकीय आणि सुरक्षा पातळीवर चिंता वाढली आहे. राष्ट्रवादी संघटनांच्या मते, ११ ऑगस्ट १९४७ रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र अस्तित्व मिळाले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याचे विलीनीकरण झाल्याचा दावा करत स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रश्नाची दखल घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

मात्र, पाकिस्तान सरकारने हा दावा फेटाळून लावत (Balochistan Independence Day) बलुचिस्तान हा देशाचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान, या प्रदेशात सुरक्षा दलांवरील हल्ले, स्फोट आणि सशस्त्र संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कारवाया सुरू आहेत. राष्ट्रवादी गट स्थानिकांवर अन्याय आणि आर्थिक-राजकीय हक्कांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आहेत. विश्लेषकांच्या मते, नैसर्गिक संसाधने, सीपेक प्रकल्प आणि प्रादेशिक भू-राजकारणामुळे बलुचिस्तानचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला असून, ११ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांकडे जगाचे लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्याचा प्रयत्न

११ ऑगस्टच्या घोषणेमागे केवळ प्रतीकात्मक संदेश नसून, (Balochistan Independence Day) बलुचिस्तानचा प्रश्न पुन्हा जागतिक स्तरावर चर्चेत आणण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषक सांगतात. काही संघटना विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे समर्थनाची मागणी करत आहेत. मात्र, स्वतंत्र बलुचिस्तानला अद्याप कोणत्याही देशाने अधिकृत मान्यता दिलेली नाही.