Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > देश

Nidhi Singh Death

सुरतमध्ये 24 वर्षीय निधी सिंहचा घरात मृत्यू; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी; पती आरोपी

गुजरातमधील सुरतमध्ये 24 वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.


सुरतमध्ये 24 वर्षीय निधी सिंहचा घरात मृत्यू अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी  पती आरोपी

Nidhi Singh Death |

निधी सिंहचा 25 ऑगस्टला घरात मृतदेह आढळला; अंतर्वस्त्रांमध्ये कथित आत्महत्येची चिठ्ठी सापडल्याने तपासाला वेगळे वळण

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये 24 वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. भाजपच्या माजी महिला पदाधिकारी शशी सिंह यांच्या सुनेचा 25 ऑगस्ट रोजी घरात मृतदेह आढळून आला. या प्रकरणी मृत महिलेचा पती सौरभ सिंह (26) आणि त्याच्या एका महिला मैत्रिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव निधी सिंह असून ती बिहारमधील मुजफ्फरपूरची रहिवासी होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह सौरभ सिंहसोबत झाला होता. निधीच्या कुटुंबीयांनी सौरभचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. या संबंधांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांना निधीच्या अंतर्वस्त्रांमध्ये आत्महत्येची चिठ्ठी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या चिठ्ठीत नेमके काय नमूद आहे, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. या चिठ्ठीचा तपासातील महत्त्वाचा पुरावा म्हणून पोलीस तिची सत्यता आणि त्यातील मजकूर तपासत आहेत.

घरात आढळला फासावर लटकलेला मृतदेह

पोलिसांच्या माहितीनुसार, 25 ऑगस्टच्या संध्याकाळी सौरभची आई शशी सिंह घरी परतल्यानंतर त्यांना निधी बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी घरात अन्य कोणीही उपस्थित नव्हते. घटनेची माहिती मिळताच शशी यांनी पती संजय सिंह आणि मुलगा सौरभ यांना कळवले. त्यानंतर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.

सिंह कुटुंबीय मूळचे बिहारमधील सीतामढी येथील असून अनेक वर्षांपासून सुरतमध्ये वास्तव्यास आहेत. निधीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचा भाऊ आदित्य कुमार सुरतला पोहोचला. त्याने सौरभ सिंह तसेच त्याच्या महिला मैत्रिणीविरोधात पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे कडोदरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंधांवरून पती-पत्नीमध्ये वाद

आदित्य कुमारने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सौरभ आणि त्याच्या महिला मैत्रिणीचे लग्नापूर्वीपासून संबंध असल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर निधीला या नात्याची माहिती मिळाल्यानंतर तिचे सौरभसोबत वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

निधीने या परिस्थितीबाबत बिहारमध्ये राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना माहिती दिल्याचेही तिच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. कुटुंबीयांनी सौरभला संबंधित महिलेपासून दूर राहण्यास सांगितल्याचा आरोप आहे. मात्र, त्यानंतरही सौरभचे तिच्याशी संबंध कायम होते आणि तो तिला घरी घेऊन येत असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.

अंतर्वस्त्रांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीची पोलिसांकडून तपासणी

शवविच्छेदनाच्या वेळी निधीच्या अंतर्वस्त्रांमध्ये आत्महत्येची चिठ्ठी मिळाल्याचे समोर आले आहे. निधीने ती चिठ्ठी जाणूनबुजून लपवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सासरच्या मंडळींकडून चिठ्ठी नष्ट होण्याची भीती तिला असावी, अशी शक्यताही तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या चिठ्ठीचा मजकूर, तिची सत्यता आणि त्यातील उल्लेखांची पडताळणी पोलीस करत आहेत. कडोदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही.ए. देसाई यांच्या माहितीनुसार, तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांच्या आधारे सौरभ आणि त्याच्या महिला मैत्रिणीविरोधात तपास सुरू आहे. दोघांच्या संबंधांशी संबंधित पुरावेही गोळा केले जात आहेत.

शशी सिंह यांचे नाव एफआयआरमध्ये नाही; भाजपचे स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणात शशी सिंह यांच्या राजकीय पार्श्वभूमीबाबतही भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भाजपचे सुरत जिल्हाध्यक्ष भरत राठोड यांनी सांगितले की, पक्षाने कडोदरा पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतली आहे. शशी सिंह यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भरत राठोड यांच्या माहितीनुसार, शशी सिंह मागील कार्यकाळात सुरत जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. त्या सध्या पक्षाच्या सक्रिय सदस्य असून विविध पक्षीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.

पोलिसांकडून या प्रकरणातील आरोप आणि संबंधित सर्व बाबींची चौकशी सुरू असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

Related to this topic: