Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > देश

नेपाळ महाप्रलय पुर

देव तारी त्याला…! 3 दिवस चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या 6 वर्षांच्या चिमुकलीला जीवदान

Nepal Flood: पाळमधील महाप्रलयकर पुरात असंख्य लोकांचे जीव गेले. ढिगाऱ्याखाली अडकलेली एका 6 वर्षीय मुलीला शुक्रवारी बचाव पथकांनी जिवंत बाहेर काढले. सलग तीन दिवस ही चिमुरडी ढिगाऱ्याखाली अडकली होती...


देव तारी त्याला… 3 दिवस चिखलाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या 6 वर्षांच्या चिमुकलीला जीवदान

Nepal Flood |

काठमांडू (Nepal Flood) : नेपाळमधील महाप्रलयकर पुरात असंख्य लोकांचे जीव गेले. त्यामुळे बचाव मोहीम सुरू असून अनेकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. दरम्यान, बुधवारपासून ढिगाऱ्याखाली अडकलेली एका 6 वर्षीय मुलीला शुक्रवारी बचाव पथकांनी जिवंत बाहेर काढले. सलग तीन दिवस ही चिमुरडी ढिगाऱ्याखाली अडकली होती. या (Nepal Flood) घटनेमुळे देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती आली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ढिगाऱ्याखालून रडण्याचा आवाज आला अन्…

आपत्ती व्यवस्थापन पथके वाचलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. दरम्यान, या मुलीचा शोध लागला. नाट्यमय सुटकेने आशेचा एक किरण दिसला आहे. ही घटना रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावात घडली. (Nepal Flood) वाचलेल्यांचा शोध घेत असताना सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना मातीच्या ढिगाऱ्याखालून रडण्याचा क्षीण आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने पावले उचलत खोदकाम सुरू केलं आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू

सुरुवातीला तिच्यावर तिमुरे येथील एपीएफ बॉर्डर आउटपोस्टवर उपचार करण्यात आले, परंतु तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने चांगल्या वैद्यकीय सुविधेत हलवणं आवश्यक होते. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळीच तिला विमानाने काठमांडूला नेण्याची व्यवस्था केली होती, मात्र (Nepal Flood) खराब हवामानामुळे अडथळा निर्माण झाला. बचावकर्त्यांनी शनिवार दुपारपर्यंत तिची प्रकृती स्थिर ठेवली, त्यानंतर हवामान स्वच्छ होताच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तिला काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक

या (Nepal Flood) बचावाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, युजर्सनी जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. एका युजरने एक्सवर लिहिले, “शोध कधीही न थांबवणाऱ्या सशस्त्र पोलीस दलाच्या टीमचा आदर.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “जेव्हा सर्व आशा संपल्या होत्या, तेव्हा ती सापडली.” काही जणांनी तर तिची आपल्या कुटुंबाशी भेट व्हावी यासाठी ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन केले आहे. एका युजरने लिहिले, “अधिकारी आता तिच्या कुटुंबाचा किंवा नातेवाईकांचा शोध घेत आहेत. जर कोणी मनीषा मगरला ओळखत असेल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल काही माहिती असेल, तर कृपया संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधा.”