जयपूरमध्ये 23 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2026च्या अंतिम फेरीत केरळच्या 19 वर्षीय केजिया लिज मेजो हिने बाजी मारत प्रतिष्ठेचा किताब आपल्या नावावर केला.
लॉ स्टुडंट असलेली केजिया मॉडेलिंग, अभिनय आणि क्लासिकल डान्समध्येही सक्रिय; आता मिस युनिव्हर्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
जयपूरमध्ये 23 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2026च्या अंतिम फेरीत केरळच्या 19 वर्षीय केजिया लिज मेजो हिने बाजी मारत प्रतिष्ठेचा किताब आपल्या नावावर केला. देशभरातून आलेल्या 52 स्पर्धकांमध्ये तिच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वासोबतच टॅलेंट आणि रॅम्पवरील प्रभावी सादरीकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
मिस युनिव्हर्स 205 मनिका विश्वकर्मा यांच्या हस्ते केजियाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढवण्यात आला. या विजयानंतर केजिया लिज मेजोबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. सौंदर्याबरोबरच तिची स्टाइल, आत्मविश्वास आणि विविध कलाक्षेत्रांतील सहभाग यामुळे ती विशेष चर्चेत आली आहे.
या स्पर्धेत तमिळनाडूच्या वैष्णवी गणेश हिने फर्स्ट रनर-अपचा मान मिळवला. तिला मिस इंटरनॅशनल इंडिया 2026 हा किताबही मिळाला. गुजरातच्या अनुश्री सतवलेकर हिने दुसरी रनर-अप म्हणून स्थान पटकावले.
मिस युनिव्हर्स इंडिया 2026चा किताब जिंकल्यानंतर केजिया आता मिस युनिव्हर्स 2026 या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
केजिया लिज मेजो ही लॉ स्टुडंट असून मॉडेलिंगसोबतच अभिनय आणि क्लासिकल डान्समध्येही तिचा सहभाग आहे. इंस्टाग्रामवर तिचे 40,700 फॉलोअर्स आहेत. मिस युनिव्हर्स इंडिया 2026च्या अंतिम फेरीपूर्वीही तिने सौंदर्यस्पर्धांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मे 2026मध्ये केजियाने मिस युनिव्हर्स केरळ 2026चा किताब जिंकला होता. त्यानंतर मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेतील तिचा प्रवास पुढे सुरू झाला. यापूर्वी ती मिस टीन इंटरनॅशनल 2025मध्ये फर्स्ट रनर-अप ठरली होती.
17 एप्रिल 2007 रोजी जन्मलेल्या केजियाने कमी वयातच सौंदर्यस्पर्धांच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. जानेवारी 2025मध्ये ती 17 वर्षांची असताना तिने मिस टीन इंटरनॅशनल इंडिया 2026चा किताब जिंकला आणि त्यानंतर मिस टीन इंटरनॅशनल 2025मध्ये सहभागी झाली. या स्पर्धेत तिने फर्स्ट रनर-अपचे स्थान मिळवले.
केजियाच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक विशेष बाब म्हणजे तिची फॅशन सेन्स. पारंपरिक भारतीय पेहरावापासून ग्लॅमरस गाऊनपर्यंत विविध लूक ती आत्मविश्वासाने सादर करते. एका लूकमध्ये तिने डीप नेक असलेल्या रंगीबेरंगी सेक्विन स्लीव्हलेस ब्लाउजसोबत साडी परिधान करून देसी ग्लॅमरचा अंदाज दाखवला होता. स्टेटमेंट ज्वेलरीमुळे तिच्या लूकला आणखी उठाव मिळाला.
मिस युनिव्हर्स केरळ 2026चा किताब पटकावल्यानंतर रॅम्पवर उतरतानाही तिचा पारंपरिक लूक चर्चेचा विषय ठरला होता. हिरव्या रंगाच्या सिल्क साडीवर असलेल्या सोनेरी जरीच्या कामामुळे तिचा पोशाख आकर्षक दिसत होता. त्यावर डोक्यावर सजलेला मुकुट तिच्या लूकला विशेष राजेशाही अंदाज देत होता.
मिस टीन इंटरनॅशनलच्या प्रवासातही केजियाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. गोल्डन थाय-हाय स्लिट कट गाऊनवरील चमकदार डिझाइनमुळे तिच्या लूकला ग्लॅमरची जोड मिळाली होती आणि तिने हा पेहराव आत्मविश्वासाने कॅरी केला.
आता 19व्या वर्षी मिस युनिव्हर्स इंडिया 2026चा मुकुट पटकावल्यानंतर केजिया लिज मेजो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे.