पती सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना मृत्युदंड; जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी सुनावला निकाल
मेरठ : देशभरात खळबळ उडवणाऱ्या मेरठमधील ब्लू ड्रम हत्या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्याची माहिती समोर आली आहे. मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांच्यावर मुस्कानचा पती सौरभ राजपूत याच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणात मेरठचे जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी निकाल दिल्याचे वृत्त आहे.
ही घटना ३ मार्च २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणात मुस्कानने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूतची हत्या केल्याचा आरोप होता. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये लपवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले होते. या घटनेमुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती.
नीले ड्रम वाले सौरभ राजपूत हत्याकांड में कोर्ट का बड़ा फैसला। आरोपी मुस्कान और उसके प्रेमी साहिल को फांसी की सजा। नीले ड्रम वाले हत्याकांड में सजा सुनते ही रो पड़ी मुस्कान। #SaurabhRajputMurderCase #Muskan #Sahil #MeerutMurderCase #CrimeNews #CourtVerdict #UttarPradesh #BreakingNews #CrimeUpdate
— Bobby Singh Chauhan (@Bobbysingh1239_) October 14, 2026
वाढदिवसासाठी लंडनहून भारतात आला होता सौरभ
सौरभ राजपूत हा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता. मुस्कान रस्तोगीशी त्याचे लग्न झाले होते. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सौरभ २४ फेब्रुवारी २०२५ रोजी लंडनहून भारतात परतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्याची हत्या झाल्याचा आरोप समोर आला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुस्कान आणि साहिल यांनी मिळून सौरभवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते ड्रममध्ये ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये मावत नसल्याने त्यांचे आणखी लहान तुकडे करण्यात आल्याचे तपासातील वृत्तांत सांगतात.
BREAKING 🚨 Meerut Blue Drum case : Muskaan Rastogi, Lover Sahil Shukla get Death Penalty. 126 hearings and 22 witness statements, finally justice served. https://t.co/5rgujiEeWU
— D (@Deb_livnletliv) October 14, 2026
देशभरात गाजले होते प्रकरण
या हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि दोघांविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया पार पडली.
आता या प्रकरणात दोन्ही आरोपींना मृत्युदंड सुनावण्यात आल्याचे वृत्त आहे. मेरठचे जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निर्णय दिल्याचे सांगितले जात आहे. या निकालामुळे चर्चेत असलेल्या ब्लू ड्रम हत्या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.