Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

Medanta Hospital

सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाची परवानगी; केंद्राचीही हरकत नाही

दिल्लीत NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाने अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे.


सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाची परवानगी केंद्राचीही हरकत नाही

Medanta Hospital |

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल याचिकेवर सुनावणी; उपचाराबाबत अंतिम निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा, केंद्र सरकारची भूमिका

दिल्लीत NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाने अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत, ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनादरम्यान उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला होता.

उपोषण सुरू असतानाच वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी केला होता. हा प्रकार दडपशाहीचा असल्याचे सांगत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाऐवजी गुरुग्राममधील मेडांता रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती.

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले की, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेडांता रुग्णालयात हलवण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, रुग्णालय बदलण्याचा निर्णय हा केवळ वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेतला जावा, रुग्णाच्या इच्छेनुसार नव्हे, अशी भूमिका केंद्राने मांडली.

केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, वांगचुक यांचा डिस्चार्ज डॉक्टरांच्या शिफारशीनुसारच व्हायला हवा. त्यांनी यावेळी वांगचुक यांच्या आसपास असलेल्या काही व्यक्तींविषयी चिंता व्यक्त करत, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून त्यांना रुग्णालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही नमूद केले.

दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली. हा निर्णय त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर देण्यात आला.

सध्या सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत. NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणादरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

Related to this topic: