Helicopter Missing

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता; ५ प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू, अपघाताची भीती

बद्रीनाथ-जोशीमठदरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता! पाच प्रवासी आणि पायलटचा शोध सुरू असून चमोली प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता; ५ प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू, अपघाताची भीती

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील घटना; बद्रीनाथ-जोशीमठदरम्यान हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, जिल्हा प्रशासनाकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू.

उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम येथून परतीच्या प्रवासाला निघालेल्या हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यान हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि एक पायलट असल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागत नसल्याने अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने शोधमोहीम हाती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ धाम येथून प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर परतीच्या मार्गावर होते. मात्र, प्रवासादरम्यान अचानक त्याची लोकेशन मिळणे बंद झाले. बराच वेळ संपर्क होऊ न शकल्याने संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे.

चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, हेलिकॉप्टरची लोकेशन उपलब्ध होत नसल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची पथके कामाला लागली असून, संबंधित हेलिकॉप्टर कंपनीचे कर्मचारीही शोधकार्यात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, हेलिकॉप्टर नेमके कोणत्या ठिकाणी बेपत्ता झाले, त्याची सद्यस्थिती काय आहे आणि त्यातील प्रवाशांची अधिकृत संख्या किती आहे, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. हेलिकॉप्टरचा अपघात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या प्रशासनाकडून हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.