Government Collapse Claim

राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा? ‘‘सरकार कोसळणार, खात्रीने सांगतो’ म्हणत व्हिडिओतून मोठा दावा

राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कोसळण्याचा दावा केला. SIR प्रक्रिया आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे.

राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा? ‘‘सरकार कोसळणार, खात्रीने सांगतो’ म्हणत व्हिडिओतून मोठा दावा

SIR प्रक्रिया रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी; सीजेपीच्या जंतरमंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा व्हिडिओ चर्चेत

देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. सरकार कोसळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची (SIR) प्रक्रिया रद्द करण्यासाठी विरोधकांकडून आंदोलन सुरू असतानाच राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. दुसरीकडे, दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचीही तयारी सुरू आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला. सरकारी यंत्रणांमध्ये काम करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे जनतेची सेवा करण्यासाठी आहेत, त्यांना जनतेपेक्षा श्रेष्ठ समजता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

भारतीय नागरिकांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कोसळण्याचा दावा केला. जनतेचा आवाज दाबण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. नागरिकांना त्यांच्या निवडून दिलेल्या किंवा घटनात्मक पदांवरील व्यक्तींना प्रश्न विचारण्याचा आणि भेटण्याची मागणी करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडी आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या आठवड्यात आंदोलनाची मालिका सुरू केली. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा रोखल्यानंतर खासदारांनी आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन सुरू केले. संध्याकाळपर्यंत त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते.

दुसऱ्या दिवशीही निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांनी राजघाट येथे शांततापूर्ण सत्याग्रह केला. काल लंच डिप्लोमसीनंतरही आंदोलन करण्यात आले. या सर्व आंदोलनांमधून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबरोबरच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर आक्षेप नोंदवण्यात आला.

आंदोलनादरम्यान काही सदस्यांनी ‘ग्यानू तो गियो’ अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगासह भाजपवरही टीका केली आहे.

19 पक्षांचा पाठिंबा; गैरहजर खासदारांना काँग्रेसकडून सूचना

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह एकूण 19 पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र, आंदोलनाच्या पुढील टप्प्यांमध्ये काही पक्षांचे खासदार उपस्थित नसल्याचे दिसून आले.

काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी न झालेल्या खासदारांनाही पक्षाकडून जाब विचारण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर अनेक खासदार आंदोलनात सहभागी झाले. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोगाबरोबरच भाजपच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

जंतरमंतरवरील सीजेपी आंदोलनाकडे लक्ष

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतरवर आज कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेस आणि इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असताना, सीजेपीच्या आंदोलनामुळेही दिल्लीतील राजकीय वातावरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राहुल गांधी यांच्या सरकार कोसळण्याच्या दाव्यामुळे आणि विरोधकांच्या आंदोलनांमुळे आगामी काळात केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

Aditya Thackeray: राहुल गांधी यांनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप खरा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nov 15, 2026
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा! काही गोष्टी जवळपास ठरल्याचे सांगत संभाव्य निर्णयाला विरोध.

Nov 14, 2026
'माझा फोन टॅप केला जातोय'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

'माझा फोन टॅप केला जातोय'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम

Nov 13, 2026
दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान! शरद-अजित पवार एकत्र आल्यास जुन्या कार्यकर्त्यांना आनंद होईल, अशी भूमिका.

Nov 13, 2026
मोदींकडून राहुल गांधींचा फोन टॅपिंग? म्हणाले, माझ्याकडे पुरावे!

मोदींकडून राहुल गांधींचा फोन टॅपिंग? म्हणाले, माझ्याकडे पुरावे!

राहुल गांधींचा मोदींवर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप! माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा करत पंतप्रधानांना दिले जाहीर चर्चेचे आव्हान.

Nov 13, 2026