जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई
मुंबई (Flood-Affected Farmers Financial Aid) : राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 262 कोटी 69 लाख 95 हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीपोटी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांचा समावेश आहे. या (Flood-Affected Farmers Financial Aid) निर्णयामुळे राज्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
27 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ
राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 3 लाख 9 हजार 289 बाधित शेतकऱ्यांच्या सुमारे 2 लाख 68 हजार 918 हेक्टर क्षेत्रासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागांतील 27 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
शेतजमिनीच्या नुकसानीसाठीही मदत
अतिवृष्टी आणि पुरामुळे केवळ शेतीपिकांचेच नव्हे, तर शेतजमिनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा (Flood-Affected Farmers Financial Aid) बाधित शेतकऱ्यांसाठीही शासनाने स्वतंत्र निधी मंजूर केला आहे. राज्यातील 34 हजार 984 शेतकऱ्यांच्या 7 हजार 675.40 हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीपोटी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
विदर्भासह विविध विभागांचा समावेश
अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा शेतजमिनीच्या नुकसानीसाठी मंजूर केलेल्या मदतीत समावेश आहे. (Flood-Affected Farmers Financial Aid) अतिवृष्टी आणि पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या निर्धारित निकषांनुसार मदत वितरित केली जाणार आहे.