Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > देश

Facebook Down

Facebook Down: जगभरात फेसबुकची सेवा ठप्प; भारतासह लाखो युजर्सना लॉग-इन आणि न्यूज फीडमध्ये अडचणी

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुक (Facebook) ची सेवा रविवारी दुपारनंतर अचानक विस्कळीत झाली.


facebook down जगभरात फेसबुकची सेवा ठप्प भारतासह लाखो युजर्सना लॉग-इन आणि न्यूज फीडमध्ये अडचणी

Facebook Down |

Downdetector वर तक्रारींचा पूर; Meta कडून कारण स्पष्ट नाही, सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुक (Facebook) ची सेवा रविवारी दुपारनंतर अचानक विस्कळीत झाली. भारतासह अनेक देशांमधील लाखो युजर्सना लॉग-इन करता न येणे, न्यूज फीड रिफ्रेश न होणे, फोटो-व्हिडिओ अपलोड करण्यात अडथळे येणे आणि मेसेज पाठवताना अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या आहेत. या समस्येची नोंद इंटरनेट सेवांवर लक्ष ठेवणाऱ्या Downdetector या प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात झाली.

Downdetector च्या माहितीनुसार, फेसबुक सेवेबाबतच्या तक्रारींमध्ये अल्पावधीतच मोठी वाढ झाली. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील विविध देशांमधील युजर्सना फेसबुक योग्य प्रकारे वापरता येत नसल्याची समस्या जाणवली. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

या बिघाडाचा सर्वाधिक परिणाम फेसबुक अकाऊंटमध्ये लॉग-इन करण्याच्या प्रक्रियेवर झाला. अनेक युजर्सना डेस्कटॉप व्हर्जनवर साइट उघडत नव्हती, तर काहींना मोबाईल ॲपमध्येही सेवा व्यवस्थित मिळत नव्हती. न्यूज फीड अपडेट होणे, पोस्ट प्रकाशित करणे आणि मेसेजिंग सेवा वापरणेही अनेकांसाठी अशक्य झाले.

याचदरम्यान, अनेक वापरकर्त्यांनी X (पूर्वीचे Twitter) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन फेसबुक डाऊन झाल्याबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या. अचानक आलेल्या या सर्व्हर समस्येमुळे काही काळ फेसबुक वापरणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

फेसबुकची मूळ कंपनी Meta कडून या तांत्रिक बिघाडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, सर्व्हरमधील समस्या दूर करण्यासाठी संबंधित अभियंते काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सेवा पूर्ववत कधी होणार, याकडे जगभरातील युजर्सचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अनेकांच्या स्क्रीनवर "Account temporarily unavailable. Your account is temporarily unavailable due to a site issue. We hope this will be resolved shortly. Please try again in a few minutes." असा संदेश दिसत होता. त्यामुळे अनेकांनी वारंवार लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून कोणताही उपयोग झाला नाही.

तज्ज्ञांच्या मते, ही समस्या वैयक्तिक अकाऊंटशी संबंधित नसून सर्व्हरशी निगडित आहे. त्यामुळे फेसबुक सुरू होत नसल्यास घाबरण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत पासवर्ड बदलणे, ॲप वारंवार बंद-चालू करणे किंवा अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करणे आवश्यक नसल्याचे सांगितले जात आहे. Meta कडून तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर फेसबुकची सेवा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.

Related to this topic: