Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

Delhi Protest

'20 जुलै भारतीय लोकशाहीतील ब्लॅक डे'; दिल्लीतील लाठीचार्जवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

दिल्लीतील जंतर-मंतर येथे 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आयोजित आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे.


20 जुलै भारतीय लोकशाहीतील ब्लॅक डे दिल्लीतील लाठीचार्जवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

Delhi Protest |

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिस कारवाईचा निषेध; जंतर-मंतरवर पुन्हा विद्यार्थ्यांची गर्दी, अभिजीत दिपके यांची मंत्र्यांशी चर्चेची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आयोजित आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईचा निषेध करत शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. 20 जुलै हा भारतीय लोकशाहीतील 'ब्लॅक डे' असल्याचे त्यांनी म्हटले असून, या घटनेमुळे जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच, आंदोलनस्थळी दुपारनंतर पुन्हा जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील युवा शक्तीने आपल्या भावना आणि संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता आणि त्यालाच लोकशाही म्हणतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सरकारच्या काळात पोलिसांनी तरुण आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला, अश्रूधूराचा वापर केला तसेच त्यांना फरफटत नेऊन गंभीर मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत म्हणाले की, आंदोलनादरम्यान घडलेले दृश्य पाहून जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. त्या घटनेत जनरल डायरने गोळीबार केला होता, तर येथे भाजपच्या "जनरल कायर"ने लाठीमार आणि अश्रूधूराचा वापर केला, अशी टीकाही त्यांनी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा आक्रोश पाहून मन हेलावल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी सरकारवर आणखी टीका करत, देशातील विद्यार्थी आणि युवकांवरील कारवाई हा सरकारचा भीतीपोटी घेतलेला निर्णय असल्याचा आरोप केला. 20 जुलै हा दिवस भारतीय लोकशाहीतील काळा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या कारवाईला "डरपोकपणा" असे संबोधले. सरकार आंदोलन दडपण्यासाठी हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राऊत यांनी सांगितले की, काल त्यांनी सोनम वांगचुक यांची रुग्णालयात भेट घेतली होती. त्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलकांचीही भेट घेतली असून, आजही आंदोलनस्थळी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कालच्या लाठीचार्जनंतरही दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक आजही आंदोलनस्थळी दाखल झाले असून, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जात आहे. पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परिस्थिती लक्षात घेऊन जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी स्वतः जंतर-मंतर येथे येऊन आंदोलकांशी थेट चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

Related to this topic: