Cyclone Murasu

'मुरासू' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार! ताशी ११० किमी वेगाने वारे

मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता. ताशी ११० किमी वेगाने वारे, चेन्नईत मुसळधार पाऊस आणि अनेक भागांत अलर्ट.

'मुरासू' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार! ताशी ११० किमी वेगाने वारे

ओंगोलजवळ २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते ३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; चेन्नईत मुसळधार पाऊस, विमानसेवा विस्कळीत, एनडीआरएफची पथके तैनात

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मुरासू' चक्रीवादळाने आता वेग पकडला असून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २ नोव्हेंबरच्या रात्री साडेअकरापासून ते ३ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजेपर्यंत हे चक्रीवादळ ओंगोलजवळ किनारपट्टीवर धडकू शकते. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनारपट्टीच्या भागात खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या निरीक्षणानुसार, हे चक्रीवादळ चेन्नईपासून सुमारे २०० किलोमीटर, तर नेल्लोरपासून २१० किलोमीटर अंतरावर होते. ताशी २५ किलोमीटर वेगाने ते किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत होते. दरम्यान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील काही भागांत पावसाचा जोर वाढला असून किनारपट्टीवर उंच लाटा उसळत आहेत.

चेन्नईसह तामिळनाडूमध्ये पावसाचा जोर

मुरासू चक्रीवादळाचे परिणाम किनारपट्टीच्या भागात जाणवू लागले आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील मायापाडू समुद्रकिनाऱ्यावर जोरदार वारे वाहत असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत.

दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये रविवार रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. चेन्नई, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशातील बापटला, कृष्णा आणि प्रकाशम या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच विजयवाडा विमानतळावरील दहा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

'मुरासू' नावाचा अर्थ काय?

या चक्रीवादळाला भारताने 'मुरासू' हे नाव दिले आहे. तमिळ भाषेत मुरासू या शब्दाचा अर्थ 'युद्धाचा नगारा' असा होतो.

१ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रातून या चक्रीवादळाची निर्मिती झाली. अवघ्या २४ तासांच्या आत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. विशेष म्हणजे, एका आठवड्याच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी 'अर्णब' चक्रीवादळ निर्माण झाले होते.

अल्प कालावधीत सलग दोन चक्रीवादळे तयार झाल्याने बंगालच्या उपसागरातील हवामानासह लगतच्या किनारपट्टीच्या प्रदेशांमध्येही मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

ओडिशातही प्रशासनाकडून खबरदारी; यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मुरासू चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ओडिशातील रायगडा जिल्ह्यातही आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ११ अग्निशमन केंद्रांमधून बचाव आणि मदतकार्यांसाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३२६ वरील गुम्मा व्हॅली आणि मुकुंदपूर व्हॅली परिसरात आपत्कालीन परिस्थितीत रस्ते बंद करणे किंवा अडथळे दूर करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यासाठी जेसीबी, एक्स्कॅव्हेटर आणि हायड्रा क्रेन उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने रायगडा जिल्ह्यासाठी २ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट, तर ३ आणि ४ नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २ आणि ३ नोव्हेंबर रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याचा संभाव्य कालावधी जवळ येत असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशातील प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे.

संबंधित सामग्री

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांचा धुमाकूळ; ‘मुरासू’मुळे पावसाचे संकट?

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांचा धुमाकूळ; ‘मुरासू’मुळे पावसाचे संकट?

Cyclone Murasu wreaks havoc: बंगालच्या उपसागरात एकापाठोपाठ एक हवामान प्रणाली सक्रिय होत असल्याने चक्रीवादळांचा धोका वाढल्याचे चित्र आहे. ‘अर्णब’ वादळानंतर आता ‘मुरासू’ चक्रीवादळ..

Nov 06, 2026
आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकलं; INSAT-3DS उपग्रहाने टिपले भीषण वादळाचे फोटो

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकलं; INSAT-3DS उपग्रहाने टिपले भीषण वादळाचे फोटो

अर्णव चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर लँडफॉल. INSAT-3DS उपग्रहाने टिपली छायाचित्रे; ताशी १५० किमी वेगाच्या वाऱ्यांनंतरही पावसाचा धोका कायम.

Oct 28, 2026
देशात चक्रीवादळाचे संकट; किनारपट्टी भागांत हाय अलर्ट, पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा

देशात चक्रीवादळाचे संकट; किनारपट्टी भागांत हाय अलर्ट, पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा

Arnab Cyclone Crisis: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 12 तासांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरच्या सकाळी हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ.

Oct 27, 2026
तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026