नवी दिल्लीतील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह तीन नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर CJP नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच, आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत. आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा आशुतोष रांका यांनी घेतला. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेला संघर्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला.
Delhi: CJP Co-Convenor Ashutosh Ranka says, "The way four former Chief Ministers—Arvind Kejriwal, Mamata Banerjee, Manik Sarkar, Pinarayi Vijayan—came out on the streets yesterday with the students and youth of this country, we wholeheartedly thank them for the fight they waged to save the democracy of this country's people..."
— IANS (@ians_india) October 11, 2026
‘ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न’
पत्रकार परिषदेत बोलताना आशुतोष रांका यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग भाजपच्या विजयासाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा खराब होत असल्याचे त्यांनी म्हटले.
Lowest of Indian politics! Cockroaches are again dragging PM Modi’s dead mother into politics. Ranka says that Dipke didn’t politicise his loss like PM Modi did with his mother. In reality, PM Modi didn’t let any minister attend his mother’s last rites. He performed the rites in the morning & continued with his scheduled programmes in the evening. These Suars deserve to rot in jail.
— Ankur Singh (@AnkurSingh) October 11, 2026
देशातील आणीबाणीबाबत आतापर्यंत केवळ ऐकले होते; मात्र दिल्लीतील कारवाईमुळे त्याचा अनुभव आल्याचा दावा रांका यांनी केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद करून सामान्य नागरिकांची गैरसोय करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अभिजीत दीपके यांना आजीच्या निधनाची माहिती दिली नसल्याचा आरोप
अभिजीत दीपके यांच्याशी पोलिसांनी केलेल्या कथित वर्तनावरही आशुतोष रांका यांनी प्रश्न उपस्थित केले. दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ही माहिती समजल्यानंतरही त्यांना नातेवाईकांशी संवाद साधू देण्यात आले नसल्याचे रांका यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत त्यांनी आंदोलन मागे घेतले नसल्याचे स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा यापुढेही सुरू राहणार असून, आंदोलनाची पुढील रणनीती त्यानुसार ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सौरव दास यांचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
CJP नेते सौरव दास यांनीही पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. अटक केल्यानंतर वकिलांशी संपर्क साधू दिला जात नसल्याचा आणि कोठडीत आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता कारवाई करण्यात आल्याचा दावा करत, विमानातून आपले अपहरण केल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि मोबाईल फोन काढून घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
Delhi: CJP Co-Convenor Saurav Das says, "Let me tell you what has happened over the past three to four days. The entire city of Delhi has been turned into a cantonment. Between 30,000 and 40,000 security personnel have been called in. Troops from Naxal-affected areas, Bengal and Kashmir, including BSF personnel from border areas, have been airlifted to Delhi. More than 40,000 personnel have reportedly been deployed, and the city has been placed under heavy restrictions. This is creating a major problem. If you want to create a negative atmosphere around protesters and a movement, you do not just make things difficult for the protesters; you also create problems for ordinary citizens who may not even be participating in the protest. This creates a negative image of the movement, and that is exactly what is happening in Delhi. Closing 57 metro stations, suspending trains coming to Delhi from other states, cancelling Rajdhani Express services and shutting shops—all this is affecting ordinary people. Today is Sunday, and many people would normally be out doing their work. What purpose does shutting shops serve The government believes this will create a negative atmosphere against the youth and the movement..."
— IANS (@ians_india) October 11, 2026
CJP च्या नेत्यांनी शांततेत आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती; मात्र दिल्लीला पोलीस छावणीचे स्वरूप देण्यात आले असून, राजधानीच्या सर्व बाजूंनी नाकेबंदी केल्याचा आरोप दास यांनी केला. आंदोलकांवर हल्ले करून त्यांची डोकी फोडली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. नागरिकांची गैरसोय करून आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले.
‘सरकार लोकांविरोधात युद्ध लढत आहे’
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सौरव दास यांनी १९७५ नंतर पुन्हा एकदा हुकूमशाहीसदृश वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केला. सरकार नागरिकांविरोधातच संघर्ष करत असल्याचे सांगत, या सरकारचा शेवट जवळ आल्याचा दावाही त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी एवढी मोठी कारवाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित करत दास यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्यासह तीन नेत्यांची सुटका झाल्यानंतरही CJP ने आंदोलन थांबवण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन पुढे कशा पद्धतीने नेले जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे संबंधित नेत्यांचे दावे असून, त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.